महाबळेश्वर : मंगळवारी वेण्णालेक येथे घोडयावरून पडुन गंभिर जखमी झालेले वृध्द पर्यटक दिलीप मोतीलाल दहाडे यांचे पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना निधन झाले गेले 60 तास ते मृत्युशी झुंज देत होते दरम्यान गेली दोन महीने परवान्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या घोडेमालकांना पालिकेने अदयाप परवाने दिले नाहीत पालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.
मंगळवारी आपल्या कुटूंबासह महाबळेश्वर सहलीसाठी जळगाव वरून आलेले 62 वर्षीय वृध्द पर्यटक दिलीप मोतीलाल दहाडे हे सायंकाळी वेण्णालेक येथे घोडेसवारी साठी गेले होते तेथे घोडेसवारी करताना घोडा उधळला आणि ते मैदानावर पडले या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आणि त्यातुन रक्तस्त्राव सुरू झाला आणि ते जागेवरच बेशुध्द पडले त्याच अवस्थेत त्यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये तातडीने दाखल करणे आवश्यक होते परंतु त्यांचे नातेवाईकांना येथील रूग्णालयाची माहीती नसल्याने त्यांनी जखमी दहाडे यांना वाईला दाखल केले या वेळेत रक्तस्त्राव सुरूच होता त्यांना दोन वेळा उलटयाही झाल्या असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले वाई येथे त्यांची प्रकृती अधिकच गंभिर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले मंगळवारी सायंकाळ पासुन त्यांची मृत्युशी झुंज सुरू होती गुरूवारी सायंकाळी अखेर दिलीप दहाडे यांना मुत्यूने गाठलेच दिलीप दहाडे यांची मृत्युशी गाठ पडल्याने त्यांची झुंज संपुष्ठात आली.
दरम्यान महाबळेश्वर येथे 130 घोडे आहेत या घोडयांवर येथे अनेक कुटूंबे अवलंबुन आहेत वेण्णालेक येथे व्यवसाय करणारे घोडयांची संख्या अधिक आहे याच ठिकाणी घोडयांवरून पडुन अनेक अपघात झाले आहेत यातील काही अपघातात पर्यटकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे या प्रकारांना आळा बसावा म्हणुन महाबळेश्वर पोलिस प्रशासन व पालिका प्रशासन यांनी एकत्र येवुन एक नियमावली तयार करण्यात आली आहे तसेच घोडे व्यवसाया करीता परवाना बंधन कारक करण्यात आला आहे परवाना मिळावा या साठी येथील घोडे मालकांनी आपली सर्व माहीती भरून पालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत व्यवसाय करण्याचा परवाना व त्या बरोबर व्यवसाया साठी कोणत्या अटी व नियम आहेत आाणि कोणते नियम बंधनकारक आहे याची सर्व माहीती परवान्या बरोबर देण्यात येणार आहे दरम्यान सर्व माहीती मिळाली असतानाही गेली दोन ते तीन महीन्या पासुन पालिकेने कोणालाही परवाना दिला नाही मंगळवारी वेण्णालेक येथे अपघात झाला याचे वृत्त गुरूवारी वर्तमान पत्रात प्रसिध्द झाल्या नंतर आज शुक्रवारी परवाना देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
परवाना आणि नियम व अटी याची माहीती घोडे मालकांना नसल्याने ते पुर्वी प्रमाणेच आपला व्यवसाय करीत असल्याने अपघातात मृत्यु झालेल्या पर्यकाची जबाबदारी कोणाची या बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे दिलीप दहाडे यांच्या मृत्युला पालिका प्रशासन जबाबदार असुन पालिकेच्या मुख्याधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरातुन होत आहे.
वेण्णालेख येथे घोड्यावरुन पडलेल्या पर्यटकाचे निधन
RELATED ARTICLES