महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर सध्या गारठले व गोठले असून येथील प्रसिध्द वेण्णा तलाव परिसरात थंडीचा चांगलाच कडका पडल्याने सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. या वर्षीच्या थंडीच्या हंगामात आज हि हिमकणांची मौज दुसर्यांदा पहावयास मिळाली. या पूर्वी 11 डिसेंबर रोजी असेच हिमकण पहिल्यांदा दृष्टीस पडले होते. दरम्यान, नविन वर्षाच्या स्वागतासाठी ही पर्यटन नगरी सज्ज झाली असून त्याची मौज लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुरु झाली आहे. त्यामुळे आज वेण्णा तलाव परिसरात ठिकठिकाणी हिमकणांची दुलाई स्थानिकांसह पर्यटकांना पहावयास मिळाल्याने त्याच्यात अनोखा उत्साह व आनंद पहावयास मिळाला.
हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे आज महाबळेश्वर शहर परिसरातील नीचांकी तापमान 9.6 अंश डिग्री सेल्सियस होते तर वेण्णा तलाव परिसरात ते जाणकारांच्या माहिती प्रमाणे 2 अंश ते तीन अंश ईतके नीचांकी असावे. दरम्यान, गुरुवार रात्री पासून अचानक थंडीचा जोर वाढला आज पहाटे तर तो आणखीनच वाढला. यामुळे प्रसिध्द वेण्णा तलाव ते लिंगमाळा पर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर परिसरात ठीक ठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण झमा झाल्याचे दिसून येत होते. नौकाविहारासाठी प्रसिध्द असलेल्या वेण्णा तलावावरील बोटीमध्ये चढण्यासाठी वापरल्या जाणार्या जेट वर हिमकण ठीक ठिकाणी जमल्याने तो भाग पांढरा झाल्याचे दिसत होते तर याच परिसरातील वाहनांच्या तपांवरही हिमकणांची चादर टाकल्याचे मनमोहक दृश्य दिसत होते. येथील हिमकण जमा करण्याचा आनंद सकाळी स्थानिकांसह पर्यटकांनी मन मुरादपणे लुटला तर याच परिसरातील स्टोबेरी फळांच्या बागा तसेच स्मृतीवन पठार हिमकाणामुळे पांढरे शुभ्र झाल्याचे तसेच तेथील वेली – झाडे, झुडपे ही हिमकणाने गुरफटल्यामुळे पांढरे झाले होते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा या वर्षी दुसर्यांदा पाहिला मिळाल्याने तसेच नविन वर्षाच्या स्वागता दरम्यानच पहावयास मिळाल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्यात वेगळा उत्साह बघायास मिळत आहे.
महाबळेश्वर गारठले….. गोठले
RELATED ARTICLES