महाबळेश्वर: पालिकेतील सत्ताधारी गटातील दोन महिला लोकप्रतिनिधींच्या सासुंची मंगळवारी रात्री साडे नऊ वाजजा फ्रि स्टाईल मारामारी झाली. या मारामारीत नंतर दोन्ही बाजुंकडील मंडळी सहभागी झाल्याने त्या भागात एकच खळबळ उडाली होती. रात्री उशीरा परस्परांवर तक्रारी दाखल करण्यात आल्या. तक्रारी नुसार पोलिसांनी एका आरोपीच्या विरोधात विनयभंगासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नगरपालिका सोसायटी जवळच पालिकेच्या समाज मंदिरात एका महिला लोकप्रतिनिधीची सासु प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेते नेहमी प्रमाणे मंगळवारी देखील रात्री 9 वाजता त्या महिलांसाठी असलेल्या प्रौढ शिक्षणाचा वर्ग घेण्यासाठी आल्या असता तेथे रमेश बंडु रोकडे हे तेथे आले व त्यांनी हे समाज मंदिर काय तुझे बापाचे आहे का? असे म्हणत त्या महिलेचा ब्लाउज फाडला.
या कृतीमुळे संबंधित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. हा प्रकार सुरू असतानाच तेथे रमेश रोकडे यांची पत्नी मिरा व मुलगा अमोल तेथे आला व या तिघांनी मिळुन त्या महिलेला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. संबंधित महिलेने महाबळेश्वर पोलिसात या तिघां विरोधात आपली तक्रारी दाखल केली. तक्रारी वरून महाबळेश्वर पोलिसांनी रमेश रोकडे यांचे विरोधात विनयभंगासह मारहाण व शिवीगाळ तर त्यांची पत्नी मिरा व मुलगा उमेश रा. सर्व नगर पालिका सोसायटी यांचे विरोधात मारहाण व शिवीगाळ केली म्हणुन भादवी कलम 354 323 504 506 व 34 कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान रात्री उशीरा रमेश रोकडे यांच्या पत्नी मिरा रोकडे यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली प्रौढ शिक्षण घेणारी महीला व तिच्या सोबत असलेल्या सागर संपत कांबळे सुमीत संपत कांबळे व अक्षय पांडुरंग काकडे रा तिघेही नगर पालिका सोसायटी महाबळेश्वर अशा चौघांनी मला व माझे कुटूंबियांना विनाकारण हाताने मारहाण केली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार दाखल केली या तक्रारी नुसार महाबळेश्वर पोलिसांनी प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेणारी महीलेसह चौघां विरोधात मारहाण
व शिवीगाळ केल्या प्ररकणी भादवी 323 504 506 व 34 कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहा पोलिसा निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
दोन महिला लोकप्रतिनिधींच्या सासवांची फ्रि स्टाईल मारामारी
RELATED ARTICLES