सातारा : कांची कामकोटी पीठाचे महास्वामी प.पू.शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती तसेच प.पू. जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्य प.पू.शंकरविजयेंद्र सरस्वती यांच्या शुभाशिवार्दाने सातारा येथे साकारण्यात आलेल्या प्रसिध्द अशा श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
याही वर्षी कालपासून मंगळवार दि, 13 फेब्रुवारी 2018 पर्यंत हा महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. मंदिरात महाशिवरात्री निमित्त आज सकाळपासून महारुद्र ही सुरु करण्यात आला . या धार्मिक कार्यक्रमात कलश स्थापना,महान्यास होउन महारुद्र जप,त्यानंतर आरती व प्रसाद वितरण करण्यात आला.याचे पौरोहित्य वेदमूर्ति दत्ता शास्त्री जोशी यांनी केले.
दुपारी 4 ते 6 यावेळेत श्री रुद्र क्रमार्चना होउन अष्टावधान सेवा,महामंगल आरती व प्रसाद वितरण करण्यात आला. या धार्मीक महारुद्र कार्यक्रमात सातारा येथील वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी, श्रीकृष्ण शास्त्री जोशी यांचेसह प्रसाद कुलकर्णी,रोहीत आपटे, रोहीत जोशी, संकेत पुजारी, आदित्य कुलकर्णी,रितेश कुलकर्णी यांचेसह 80 हून अधिक ब्रह्मवृंद सहभागी झाले आहेत. यावेळी विश्वस्त रमेश शानभाग, सौ उषा शानभाग ,विश्वस्त मुकुंद मोघे,के.नारायण राव,रणजीत सावंत,वासुदेवन नायर व्यवस्थापक चंद्रन, संकेत शानभाग, राहूल घायताडे, रमेश हलगेकर, श्रीमती पाटील आदी उपस्थित होते.
महाशिवरात्री निमित्त संपूर्ण नटराज मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यामुळे मंदिराचे वैभव अधिकच खुलून दिसत आहे. त्यातच महराषृट्राचे प्रवेश्दवार असलेल्या गोपुरावर सध्या केलेले सात रंगातील आकर्षक एलईडी चे रंगीत झोतातील आकर्षण विशेष उटून दिसत आहे. .
बर्फाचे शिवलिंग दर्शनासाठी गर्दी..
सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात मुंबई येथील बादशाह या कलाकाराने साकारलेले महादेवाची शिवलिंग पिंड आणि गणेश मूर्ती.महाशिवरात्री निमित्त मंगळवार पयर्र्त हा देखावा दर्शनासाठी भावीकांना खुला आहे.देशात आजवर शेकडो ठिकाणी बादशाह यांनी अनेक देव देवतांच्या मूर्ती तसेच प्राणी व पक्ष्यांचे आकारातून बर्फाच्या मूर्तीतून मोठया समारंभासाठी बनवले आहेत. आज सायंकाळी बादशाह हे नागमूर्ती तसेच उदया महाशिवरात्री निमित्त हिमालयातील अमरनाथ गुहेतील बर्फाचे अमरनाथ चे शिवलिंग साकार करणार आहेत.या बर्फाचे शिवलिंगाचे अभिषेक करण्यासाठी ज्या भाविकांना सहभ़ागी व्हायचे आहे. त्या सर्वानी पूजाविधी व अभिषेकासाठी रुपये अकराशे भरुन त्वरीत मंदिरात मुकुंद मोघे,व व्यवस्थापक चंद्रन यांचेकडे संपर्कं साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संपर्कं फोन..9422038159,9420466402 असे आहेत.उद्या दि. 13 रोजी सकाळी, महान्यास, महारुद्र एकादश जप , लघुरुद्र होम व पूर्णाहूती होउन दुपारी कलश यात्रा,श्री मूलनाथेश्वर पिंडीस महारुद्र कलशाभिषेक, अलंकार , नैवेद्य,महामंगल आरती, प्रसाद असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
मंगळवारी महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजेपयर्ंंत मंदीर दर्शनासाठी खुले रहाणार आहे.या नटराज महाशिवरात्री महेात्सवासाठी सातारा जिल्हा वासियांनी तन, मन,धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहन मंदीराचे वतीने करण्यात आले आहे.
श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त महारुद्राचे पठणास 80 ब्रह्मवृंद सहभागी
RELATED ARTICLES