म्हासुर्णे ( तुषार माने प्रतिनिधी) -: दरवर्षी प्रमाणे चितळी ता.खटाव येथे महाशिवरात्री निमित्त ओंकारईश्वर मंदिर पवार मळा चितळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन दर वर्षी प्रमाणे करण्यात आले आहे या ही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने दिनांक 4-3-2019, व 5-3.2019 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्यामधे सकाळी ओंकारईश्वर लघु रुद्र व अभिषेक करण्यात येईल तसेच दिवसभरात गजी नृत्य,भजन ,तर सायंकाळी सौ. जयश्री इनामदार मॅडम यांचे प्रवचन होईल व त्यानंतर लहान मुलांचा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम व रात्री ह. भ. प. प्रथमेश इनामदार सर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. त्यानंतर दीप उत्सव व संगीत भजन कार्यक्रम होईल तसेच दिनांक 5-3-2019 रोजी महाआरती होईल व महाप्रसाद वाटप केला जाईल तरी सर्व भाविक भक्तानी या सोहळ्यात सहभागी व्हावे अशी विनंती श्री. मारुती पवार,यशवंत पवार, भिमराव पवार, भगवान पवार व संपूर्ण पवार मळा बंधू आणि भगिनी यांचे कडून करण्यात आली आहे
महाशिवरात्री निम्मित चितळी येथे विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES