सातारा :- मा. नामदार श्री. महेश शिंदे उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे तथा आमदार 257, कोरेगाव – खटाव विधानसभा मतदार संघ यांना सातारा जिल्ह्यास बांधकामास मिळणारा प्रोराटा फॅक्टर नुसार व रस्ता रुंदकरण खाली ईन सीटू एफ.एस.आय. मिळत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. मा. ना. महेशद शिंदे यांनी जिल्ह्यास होणाऱ्या नुकसानाचा विचार करूनसदर बाब मा. श्री. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र.राज्य व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस , उपुख्यमंत्री यांचे निदर्शनास आणून दिली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांनी जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही याची ग्वाही ना. महेशदादा शिंदे यांना दिली होती. त्याप्रमाणे मा.ना. श्री. महेशदादा शिंदे यांनी नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई येथे सातारा जिल्ह्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध विशेष लक्ष घातले होते. त्यानुसार दि. 24/07/2024 रोजी सातारा जिल्ह्यास बांधकामास मिळणारा प्रोराटा फॅक्टर नुसार व रस्तारुंदकरण खाली ईन सीटू एफ.एस.आय. महाराष्ट्र नगर विकास विभागाचे मार्फतीने मंजूर झाल्याचा आदेश पारित केला आहे. सदरील कामी नगररचना मुख्य कार्यालय, पुणे यांचे व आर्किटेक्ट श्री. सुमित बगाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. मा. ना. श्री. महेशदादा शिंदे यांचे सहकारी मा. श्री. राहुलदादा बर्गे, सातारा जिल्हा नियोजन सदस्य व ॲड. श्री. शैलेश चव्हाण, हायकोर्ट मुंबई यांनी विशेष सहकार्य केले आहे. तसेच बांधकाम व्यावसायिक श्री. हेमंत कदम, श्री. दिनेश भरगुडे, श्री. सागरघोरपडे, श्री. महेश माने, श्री. सागर शिंदे श्री. सतिशघाडगे यांनी फाईलचा योग्य तो पाठपुरावा केला आहे. बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरचे वतीने मा. ना. श्री. महेशदादा शिंदे उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचे विशेष आभार मानले.