सातारा : महिलांसाठी विविध कायदे आहेत या कायद्यांची माहिती प्रत्येक महिलेला होणे गरजे आहे. कुठल्याही महिलेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधावा, त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी केले.
येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात महिलांविषयक कायदेशीर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या शिबिरास जिल्हा न्यायाधीश अनिस जे खान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर आदी उपस्थित होते.
9 नोव्हेंबर हा राष्ट्रीय राष्ट्रीय विधी सेवा दिन या दिनानिमित्त महिलांविषयक असणार्या कायद्यांची माहिती व्हावी यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महिलां विषयी असणार्या कायद्यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शंकाचेही निरसन या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. आजही आपल्या समाजामधील स्त्रीयांवर अन्याय होत असतात तरीही अशा महिला कायद्यांचा लाभ घेत नाहीत, कायदा हा सर्वांसाठी असून तो आपला हक्क आहे, अन्याय होत असेल तर दाद मागा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून योग्य ती मदत केली जाईल, असेही आश्वासन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी यावेळी दिले.
कायदे विषयक महिलांमध्ये जागृती व्हावी, त्यांचे गैर समज दूर होऊन संवाद वाढावा हा या शिबीराचा उद्देश. कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास त्यांनी त्वरीत तक्रार करावी. न्याय हा सर्वांसाठी असून तो आपला हक्क आहे. महिलांच्या मदतीसाठी अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्याची माहिती या शिबिरामध्ये देण्यात येणार असून तुम्हाला माहिती झालेल्या कायद्यांची माहिती इतर महिलांनाही द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यावेळी केले.
कायदे आपणच बनविले आहे ते आपल्यासाठीच आहेत, या शिबिराच्या माध्यमातून महिलांनी कायद्यांची माहिती समजून घ्यावी काही अडचणी आल्यास महिलांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधावा, असे सचिव प्रविण कुंभोजकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृणाली जाधव यांनी केले. या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांविषयक असणार्या कायद्यांची माहिती प्रत्येक महिलेला होणे गरजेचे
RELATED ARTICLES