भुईंज ः कोणतीही महिला ही त्या कुटुंबाची केंद्रबिंदु असते. आजच्या स्पर्धेच्या युगात महिलांनी आपली प्रगती साधण्यासाठी उद्योग क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे. यासाठी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी विविध उद्योगाविषयी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन, महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. निलिमा मदन भोसले यांनी केले.
किसन वीर सातारा साखर कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात महिलांसाठी हळदी-कुंकु समारंभाचे आणि त्यानिमित्ताने आरोग्य संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सातारा येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सौ. कल्पना बोधे, सौ. राजश्री गजानन बाबर, कारखान्याच्या संचालिका सौ. विजया साबळे, भुईंजच्या माजी सरपंच सौ. अनुराधा भोसले, सौ. पार्वती शिंदे व श्री महालक्ष्मी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनंदा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिलांच्या आजारांबाबत स्त्रीरोगतज्ञ डॉ. कल्पना बोधे यांनी संंवाद साधला.
यावेळी बोलताना डॉ. सौ. कल्पना बोधे म्हणाल्या, महिलांमध्ये आजारपणाबद्दल बरेच गैरसमज आहेत, ते दुर करण्याची खर्या अर्थाने गरज आहे. मुलगी ही खर्या अर्थाने कुटुुुंबांची आधार असून स्त्री जन्माचे सर्व स्तरांतुन स्वागत होणे गरजेचे आहे. नुसती औषधे आजारांवर मात करण्यासाठी पुरक नसुन त्यासाठी पुरक आहार, विविध योगासने आणि व्यायामांची जोड दिल्यास होणार्या आजारांवर कायमस्वरूपी मात करणे शक्य होणार असल्याचे सांगितले.
मान्यवरांचे स्वागत सौ. शोभा शिंदे, सुत्रसंचालन सौ. रूपाली खाडे यांनी केले. प्रास्ताविक सौ. शिला जाधव -शिंदे यांनी तर आभार सौ. निलम शेवाळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. अलका डुबल, श्रीमती कविता ननावरे, सौ. स्वाती भागवत, सौ. वर्षा भोसले, सौ. रूपाली खरे, सौ. सुवर्णा गायकवाड, श्रीमती पुष्पा माने यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास कारखाना कामगार वसाहतीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे येण्याची गरज:डॉ. निलिमा भोसले
RELATED ARTICLES