Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमलकापूर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा, कॉग्रेसला नगराध्यक्षपदासह 15 जागा : तर भाजपला 5

मलकापूर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा, कॉग्रेसला नगराध्यक्षपदासह 15 जागा : तर भाजपला 5

कराडः मलकापूर नगरपालिकेच्या पचंवार्षिक निवडणुकीच्या निकालात आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रीय काँग्रेसने स्पष्ट बहुमत कायम राखत नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवून गड राखला. कोणत्याही परिस्थितीत मलकापूर जिंकण्याचा निर्धार केलेल्या भारतीय जनता पक्षाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले.
नगराध्यक्षपदाच्या रोमांचक लढतीत काँग्रेसच्या निलम येडगे यांनी भाजपच्या सारिका गावडे यांचा 270 मतांनी पराभव केला. कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये झालेल्या मतमोजणीचा दुपारी 12.30 वा. अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. अंतिम निकालात काँग्रेसचे 14 तर भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले.
यावेळी कॉग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार सौ.निलम यडगे यांना 7747 मते मिळाली. तर भाजपाच्या पराभुत उमेदवार सौ.सारीका गावडे यांना 7477 मतदान झाले.
प्रभाग निहाय कॉग्रेसच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक 1,सौ.गितांजली पाटील-843,प्रशांत चांदे-794 प्रभाग क्र.3,किशोर येडगे -1049,आनंद शिंदे-1067, प्रभाग क्र.4, राजेंद्र यादव-733,2)भारती पाटील-662, प्रभाग क्र.5, 1)कमल कुराडे-639, प्रभाग क्र.6,1)पुजा चव्हाण-758 2) शकुतंला शिंगण-798, प्रभाग क्र.7,1)स्वाती तुपे-886 2)दत्ता पवार-741, प्रभाग क्र.9, नंदा भोसले-1852, अलका जगदाळे-1784, मनोहर शिंदे -1883 मते मिळाली.
तर भाजपाच्या विजयी उमेदवारांना मिळालेली प्रभाग निहाय मते प्रभाग क्र.2, नुरजहा मुल्ला-727 ,विक्रम चव्हाण-689, प्रभाग क्र.5,1)भास्कर सोळवंडे -756, प्रभाग क्र.8 1)निर्मला काशिद-1020, 2)अजित थोरात -974 अशी मते मिळाली.
या निवडणूकीत कॉग्रेसच्या पराभुत उमेदवारांना मिळालेली मते प्रभाग क्र.2, नाजिया मुल्ला-412,मोहन शिंगाडे -450, प्रभाग क्र.5 ,मनिषा चव्हाण-740, प्रभाग क्र.8,सुनिता माळी- 811, योगेशे शिंदे 809
तर भाजपाच्या पराभूत उमदेवारांना मिळालेली मते प्रभाग क्र.1)मनिषा शिंदे-641, 2) नितीन काशिद (शिवसेना)-690, प्रभाग क्र.3, 1) मनोज शेडगे-995, उमा शिंंदे 972, प्रभाग क्र.4, अवंती घाडगे- 662, सुहास कदम-695, प्रभाग क्र.5, शोभा यादव-468, प्रभाग क्र.6,दिनेश नार्वेकर-728,पुनम जाधव-689, प्रभाग क्र.7,प्रज्ञा दरागडे- 732, 2) हणमंत जाधव-669, प्रभाग क्र.9)1)आश्‍विनी हिंगसे-873,2) स्वाती पवार-927,3) शामराव शिंदे -832
निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी केली व जल्लोष साजरा केला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राताधिकारी हिम्मत खराडे व तहसिलदार प्रशांत चव्हाण यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस प्रमुख सर्जेराव गायकवाड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular