पाटण: या काळात माणूस शिक्षणाने सुशिक्षित झाला पण माणुसकीने संपला आहे. कुटूंबातील संवाद संपल्यामुळेच नात्यांना काळींबा फासणार्या घटना घडत आहेत. माणूस पैशाने श्रीमंत झाला त्यामुळे संसारात सगळे सेट माणसाला मिळाले. पण माणसाचे मन अपसेट झाले आहे ते सेट करायचे असेल तर माणसाला परमार्थाची गरज असल्याचे मत वारकरी साहित्य परिषदेचे पाटण तालुका अध्यक्ष व पत्रकार ह. भ. प. आनंदराव देसाई चाफळकर यांनी व्यक्त केले.
पाटण येथील दत्त जयंती उत्सव समिती इंदीरानगर मंडळाने आयोजित केलेल्या दत्त जयंती उत्सवातील किर्तनात देसाई महाराज बोलत होते. यावेळी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शंकर मोहिते, कार्याध्यक्ष बाबासाहेब सुतार, चिंतामणी सुतार, विकास उलपे, गणेश सुतार, जावेद आत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान इंदीरानगर येथील दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगुरु दत्तांची विधीवत पुजा-अर्चा झाल्यानंतर अभिषेक करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वलभ दिंगबराच्या गजरात दत्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांसाठी दत्त जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
माणसाचे मन स्थिर करण्यासाठी परमार्थाची गरज: ह.भ.प. देसाई
RELATED ARTICLES