म्हसवड : येथील माण देशी किसान उत्पादक शेतकरी या कंपनी मार्फत शेतकर्यांना त्याच्याच शेतात पिक लागवड, संगोपन,अल्प खर्चात उत्पादनात वाढ व बाजारपेठ बाबत अचुक मार्गदर्शन उपयोगी पडले व शेतक-यांना अपेक्षित असा नफाही मिळु शकला.असे प्रतिपादन माण देशी महिलां बँक व माण देशी फाऊंडेशनच्या अध्यक्षाचेतना सिन्हा यांनी केले.
येथील मेगा सिटी मधील माण देशी फाऊंडेशन संचलित जनावरांच्या चारा छावणीत कंपनीच्या गोडाऊन मध्ये लीन अग्रो कंपनीच्या सहयोगातुन नाबार्ड व माण देशी किसान उत्पादक कंपनी मार्फत आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी नाबार्डचे माजी मुख्य सरव्यवस्थापक अशोक मेथिल सातारा जिल्हा नाबार्डचे व्यवस्थापक सुबोध अभ्यंकर, लिन अॅग्रीचे संस्थापक सिद्धार्थ दियालानी ,लिन अॅग्रीच्या सह-संस्थापक सई गोळे, पल्लवी कुलकर्णी, कुंदन शिनगारे माण देशी किसान उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापिका वनिता पिसे,संचालिका वंदना भन्साळी,माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,माण तालुक्यामधील शेतकरी सधन असता तर त्यास सद्यस्थितीतील दुष्काळात माण देशीच्या जनावरांच्या छावणीवर यायची वेळच आली नसती.
शेती केली तर शेतकर्यांना नफा राहिला पाहिजे. शेतकर्याची सध्याची शेतीची आवस्था खर्च जास्त उत्पादन कमी आहे त्यामुळे शेतकरी कजँबाजारी होत चालला आहे.
येथील दुष्काळी भागातील शेतकर्यांना अल्प पाण्यावर कमीतकमी खर्चात सुमारे तीस ते चाळीस टक्के पिक उत्पादन कसे देता येईल याबाबत माण देशी किसान उत्पादक कंपनीने कृषि क्षेत्रातील इतर कंपनीचे सहकार्याने येथील शेतक-याना पिक लागवडीबाबत शेतातच भेटी अचुक मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबवित आहे लीन अँग्रो या नामांकित कंपनीने येथील 130 शेतक-यांना कांदा पिकाची शास्त्रीय पध्दतीने लागवड करण्याबाबत अचुक मार्गदर्शन केले व शेतक-यांना तीस ते चाळीस टक्के जादा व दर्जेदार असे कांदा उत्पादन मिळाले. माती परिक्षण,अचुक पणे रासायनिक खतां ची प्रमाणशीर मात्रा याबाबतचे या कंपनीने वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे उत्पादनात भरी वाढ शक्य करुन दाखविली अचुक मार्गदर्शनाखाली शेती व्यवसाय केल्यास शेतकरी निश्चितच नफ्यात येतील. यासाठी प्रत्येक गोष्ट विचाराने करा. शेतकर्यांची आथिँक उन्नती साधन्यासाठी माणदेशी उत्पादक कंपनीची स्थापना केली कंपनीने धान्य साठवणुकीस गोडाऊन, फळे सुरक्षित ठेवण्यास शीतगृह,कां दा साठवणुकीस कांदा चाळ या सुविधा मेगासिटीत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत या बरोबरच पिक लागवड व संगोपनास मोफत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरु केलेला आहे.या सुविधामुळे
माणदेशी महिलांनी फाटक्या साडीतून आधुनिक महिला शेतकरी निश्चितपणे होईल असा विश्वासही श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.अशोक मेथील म्हणाले की,दहा वर्षापुर्वी मी माण देशी महिला बँकेस व पुळकोटी येथील महिलां बचत गटासही भेट दिली होती.येथील महिलांचा आत्मविस्वास पाहुन शासनाच्या नाबार्ड खात्या अंतर्गत राबविण्यात येणा-या महिलांच्या प्रत्येक योजना राबविण्याबाबत श्रीमती सिन्हा यांच्याकडे आग्रह धरला व त्यांनी त्या राबविल्याही विशेष बाब म्हणजे माण देशी मार्फत राबविलेल्या सर्व योजना राज्यात यशस्वी पायवट योजना गणल्या गेल्यात.
सुबोध अभ्यंकर यांनी नाबार्डतुन शेतकरी व महिलांसाठीही राबविण्यात येणा-या विविध अनुदानित योजनांची माहिती देत.माणदेशी बँक,माणदेशी फौडेशन बरोबर नाबार्ड मार्फत आथिँक साक्षरता होण्यासाठी विविध योजनेत सहभागी राहणे फायद्याचे आहे विशेत:भूमिहीन गरीब महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जात असुन भारत सरकार शेतकरी कंपन्यां स्थापन करुन शेतकर्यांना आथिँक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतक-यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करुन शेतकरी कंपनी स्थापन करण्याबाबतची सविस्तर अशी माहितीही त्यांनी दिली. श्री.सिध्दार्थ यांनी अग्र यीन कंपनी मार्फत येथील शेतक-यांना कांदा व इतर पिका विषयी त्यांच्या शेतात जाऊन केलेले मार्गदर्शन व संबंधित शेतक-यांचे हाती लागलेले दर्जेदार व सुमारे तीस ते चालीस टक्के जादा मिळालेल्या उत्पादना विषयी माहिती कथित केली.वनिता पिसे यांनी शेकर-यांना माणदेशी कंपनीकडुन दिल्या जातअसलेल्या विविध सुविधा व उपक्रमांची माहिती प्रास्तविकात दिली.या शेतकरी मेरा व्यास सुमारे चार हजार शेतकरी उपस्थित होते यामध्ये महिलां शेतक-यांची उपस्थिति लक्षणिय संख्येत होती. या कर्यक्रमात श्रीमती चेतना सिंन्हा यांना जागतिक महिला दिनी केंद्रीय महिला व बालकल्याण अंतर्गत 2019 मधील मनारी शक्तीफ पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते गौरविण्यात आले बद्दल उपस्थित मान्यनर शेतकरी व व्यापारी मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
माण देशी किसान उत्पादक शेतकरी कंपनीमुळ शेतकर्यांना अपेक्षीत नफा : चेतना सिन्हा
RELATED ARTICLES