Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमाजी आमदार प्रभाकरजी घार्गे यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजित खटाव - माण अँग्रो साखर...

माजी आमदार प्रभाकरजी घार्गे यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजित खटाव – माण अँग्रो साखर कारखाना येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

मायणी :- (सतीश डोंगरे)
मा श्री प्रभाकरजी घार्गे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खटाव माण अँग्रो साखर कारखाना येथे आयोजित करण्यात आलेले “रक्तदान शिबीर व सर्व रोग तपासणी शिबीर कारखाना प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
हे शिबिर कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तेजपालसिह चव्हाण , मायणी दुरक्षेत्राचे सपोनि संतोष गोसावी, ब्लड बँकेचे संजय रायबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच तसेच कारखाना अधिकारी,कर्मचारी , मजूर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली . यासाठी मेडिकल कॉलेज मायणी संलग्नित ब्लड बँक मायणी व मायणी प्राथमिक आरोग्य केंद्र मायणी यांचे सहकार्य लाभले.
त्याचबरोबर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार प्रभाकर घार्गे साहेब यांचे आगमन झाल्यानंतर केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी को चेअरमन मनोजदादा घोरपडे,मुख्य कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे,संचालक कृष्णात शेडगे,संचालक अमोल पवार,संचालक महेश घार्गे , टेंक्निकल डायरेक्टर बालाजी जाधव,चीफ इंजिनिअर महाडिक साहेब ,सतीश डोंगरे,अमोल भिसे यांची ही उपस्थिती आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular