साताराः सातार्यात जाधव कुटुंबात 29 मार्च 1999 रोजी मनालीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर मामा-मामीच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती; पण हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याला चिंतेची किनार लागली. मनाली सर्वसामान्य मुलीसारखी नव्हती. डॉक्टरांच्या मते ती विशेष लक्षणासह मोठी होणार होती. आनंदाची जागा काळजीने घेरली. तिची आई चिंतेने व्याकूळ होऊन गेली. वडिलांपुढे संघर्षाचे चित्र उभे राहिले. शेळके-जाधव परिवारात अस्वस्थता वाढली.
डॉक्टर आणि मित्रपरिवाराने समजूत घालत धीर द्यायचा प्रयत्न केला. या संकटातून मार्ग काढत मनालीचे जगणे सुंदर करण्याचा चंग बांधला. आई-वडिलांनी निश्चय केला, तो क्षण केवळ मनालीच्याच नव्हे तर शेळके, जाधव कुटुंबीय, मित्रपरिवार आणि देशातील विशेष जगताला कलाटणी देणारा व अभिमानास्पद ठरला. शाळेतील शिक्षकांनी तिच्यातील गुण हेरले. मनालीला पॉवरलिफ्टिंगमध्ये रस निर्माण होऊ शकतो. हे लक्षात आले अन् गगनाला गवसणी घालण्याचा मनालीचा प्रवास सुरू झाला.घर आणि शाळेतून तिच्या खेळाला पाठबळ मिळाले. मनालीनेही मेहनत सुरूकेली. राज्य पातळीवरील चमकदार कामगिरीने तिने देशपातळीवर मजल मारली. विशेष मुलांच्या स्पर्धेत राष्ट्रीय तिने एक सुवर्णपदक व एक कांस्यपदक मिळविले.
अबुधाबीत जगाची मने जिंकली…अबुधाबी येथे झालेल्या विशेष मुलांच्या ऑलिम्पिकमध्ये मनालीने पाऊल ठेवले आणि अवघ्या जगाची मने जिंकत तिने या ऑलिम्पिकमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक पटकाविले. त्याशिवाय स्काँट, डेडलिफ्ट व कम्बाइन्ड या प्रकारात तीन कांस्यपदके मिळवली. या स्पर्धेतील यशानंतर तिचा सर्वांना अभिमान वाटू लागला.
अनेकजण आपल्या मुलांना घेऊन मनालीकडे येत असतात. तिच्यासारखं मुलांना बनविण्याचा संकल्प करतात.
विशेष मुलांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनाली शेळकेने केली सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई ं
RELATED ARTICLES

