सातारा, दि. १२ (प्रतिनिधी) – सातारा येथील शिवविजय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री मंगलमूर्ती केअर टेकर सेंटरच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी ‘वृद्धाश्रम काळाची गरज’, ‘आदर्श वृद्धाश्रम कसा असावा ?’, ‘ वृद्धाश्रम समस्या की सोय ?’, ‘वृद्धाश्रम आणि समाज’, ‘वृद्धाश्रम असावेत की नसावेत ?’ यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. निवडक निबंधांना ट्रस्टच्या वतीने प्रसिध्दी देण्यात येईल. निबंध केशव शिवाजीराव चव्हाण ‘मंगलमूर्ती कुंज’ श्री मंगलमूर्ती केअरटेकर सेंटर, गणेश नगर, प्लॉट नं. ५ विलासपूर-सातारा या पत्त्यावर दि. ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावेत. दि. १५ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण करण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९८२२७४४४०१ किंवा ९१५६२३७५३८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
‘वृध्दाश्रम’ संकल्पनेवर मंगलमूर्ती केअरटेकर सेंटरतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES