म्हसवड: गत सात-आठ वर्षापासून मासाळवाडी ग्रामस्थ गावातीलशिक्षणासाठी झटत आहेत याचा मी साक्षीदार आहे . माणगंगा शिक्षणसंस्थेने घेतलेल्या परिश्रमाचे फळ आज विध्यार्थ्यांच्या प्रगती मधून दिसतआहे. असे उदगार आ.जयकुमार गोरे भाऊ यांनी काढले.
माणगंगा इंग्लिश मेडियम स्कूल व पँरामे्डीकल कॉलेज मासाळवाडी येथे झालेल्या श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी व वार्षिकस्नेहसंमेलन निमितात्ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ.गोरे बोलत होते ते पुढे म्हणाले माणगंगा इंग्लिश मेडियम स्कूल साठी म्हसवड परिसरातून मुले मासाळवाडीला येतात त्याचे करण त्यांची गुणवत्ता आहे त्यासाठी येथीसंस्था चालक डॉ.वसंत मासाळ, सचिव नारायण मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ, मुख्याध्यापक यांनी अतिशय प्रतीकुल परिस्थितीत हि संस्था उभी केली. गावातील विध्यार्थ्यांना शिक्षणावाचून वंचित न ठेवता त्यांना 10 वी पर्यंत इंग्रजीतून शिक्षण घेणेची संधी उपलब्ध करून दिली.
शिक्षणापूर्ण करून बाहेर पडलेले विध्यार्थी आपले स्वताचे व्यवसाय करीत असूनआपला संसाराला हातभार लावीत आहेत. या शिक्षण क्षेत्रासाठी डॉ.वसंत मासाळ यांनी ग्रंथालयाची मागणी केली असता ती मागणी नक्कीपूर्ण होईल असे आमदार जयकुमार गोरे सांगितले .पुढे बोलताना सांगितले.
डॉ.वसंत मासाळ यांचे नगरसेवक, नगराध्यक्ष, संस्था चालक म्हणून व एक चांगले डॉक्टर ,म्हणून काम अतिशय चांगले आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी ते कायम झटत असतात. नारायण मासाळ व परिसरातील ग्रामस्थांनी आमदारांना मासाळवाडीच्या तलावात पाणी कधी येणार अशी विनंती केली त्यालाही त्यांनी नक्की पुढच्या टप्प्यात मासाळवाडी तलावात पाणी येईल असे आश्वासन दिले.
विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांनी शाळेचा आलेखअतिशय वेगाने सुधारत असून इंग्रजी माध्यम असूनही ग्रामीण भागातीलविध्यार्थ्यांना चांगले घडविण्याचे काम या शिक्षकांनी व संस्था चालकाने केले असल्याचे सांगितले
या कार्याक्रमासाठी जि.प.सदस्य अरुण गोरे, केंद्र प्रमुख जगन्नाथ विरकर, मा.नगरध्यक्ष नितीन दोशी, मासाळवाडी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक साखरे नंदकुमार, डॉ.लक्ष्मण कोडलकर, म्हसवड मेडी.असो.चे अध्यक्ष डॉ.संजय करंडे ,डॉ.बाबासाहेब दोलताडे, नगरसेवकअखिल काझी,जगन्नाथ लोखंडे,संजय सोनावणे, कृष्णदेव मदने, तर धुळदेव गावाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ शारदा नाथा बनसोडे सहकुटुंब उपस्थित राहून शाळेस आर्थिक मदत दिली ,बहुतांश शाळेचे शिक्षक,ग्रामस्थ,विध्यार्थी उपस्थित होते .
दरम्यान दोन दिवस अगोदर नगरपालिका स्वच्छताकर्मचारी,ग्रामस्थ, विध्यार्थी यांनी गाव परिसर स्वच्छ केला .दि.21 रोजी सकाळी गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या आवाडते भजनगोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाफ म्हणत व स्वच्छतेचे संदेश देणार्याघोषणा देत मिरवणूक काढली. त्याच दिवशी साय. संत गाडगे महाराजपुण्यतिथी व स्नेहाम्मेलन कार्यक्रम घेनेत आला.
कार्यक्रमादरम्यान विध्यार्थ्यानी मनोगत सह वेगवेगळ्या कला सादरकेल्या. उपस्थित नागरिकांना भरपूर आनंद घेवून आपल्या मुलांनी केलेल्याअभिनयाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. प्राथ.इंग्लिश मेडीयमचेमुख्याध्यापक रावसाहेब मासाळ यांनी प्रस्ताविक केले.
यावेळी माध्य.मुख्याध्यपकश्रीमती ढेम्बरे स विता वसंत मासाळ ,करमाळकर, बागडे सर, कु.माने,लोखंडे सर,सजगाने सर,गायकवाड श्वेता,कु.राजेमाने ,कु.वेधपाठक, कु.वर्षा मासाळ, कु.लिंगे शिक्षक उपस्थित होते ,सर्वांचे आभार संस्थेचे संस्थापक डॉ.वसंत मासाळ यांनी मानले.
‘माणगंगा’ परिश्रमाचे फळ विद्यार्थ्यांच्या प्रगती मधून दिसत आहे : आ.जयकुमार गोरे
RELATED ARTICLES