Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीठेवीदारांचे पैसे परत दिले म्हणजे भागलं का ? मनोज शेंडे यांचा...

ठेवीदारांचे पैसे परत दिले म्हणजे भागलं का ? मनोज शेंडे यांचा सवाल

सातारा : टिपर चालवून काही होत नाही हे त्यांचे म्हणणे असेल तर फक्त ठेवीदारांचे पैसे परत दिले म्हणजे भागलं का? सभासदांच्या सभासद निधीचे काय? बँकेमार्फत नियमबाहय कर्ज दिलेल्या संचालकांवरील कारवाईचे काय?  याचा खुलासा आमदारमहोदय उभ्या आयुष्यात करणार का? असा जळजळीत सवाल सातारा नगरपरिषदेचे सार्वजनिक बांधकाम सभापती मनोज शेंडे यांनी करतानाच  सातारा-जावलीच्या आमदारांच्या हातात, सातारा नगरपरिषदेची शाहुपूरी ग्रामपंचयातीचीही सत्ता नाही. त्यामुळे त्यांची बैचैनी दिवसेंदिवस वाढत आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता त्यांना सातत्याने खुपत आहे. म्हणूनच भुविकास बँक ते जुना आरटीओ या रस्त्यावर त्यांच्या मार्फत  खाजगी मुरम टाकून खड्डे मुजवण्याचा चालवलेला प्रयत्न म्हणजे एक राजकीय स्टंट आहे. त्यांची कृती म्हणजे नागरीकांविषयी दाखवलेले बेगडी प्रेम आहे असा घणाघाती प्रहार केला आहे.
सातारा नगरपरिषद, रस्त्यावरील खडयांविषयी जागरुक आहे. असे नमुद करुन सभापती मनोज शेंडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की,  पोवईनाक्यावरील ग्रेडसेपरेटरमुळे वाहतुकीची, प्रामुख्याने एसटीसारख्या मोठया व जड वाहनांची वर्दळ जुने आरटीओ ऑफिस ते भुविकास बँक या रस्त्यावर वाढली आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीचा ताण आला आहे. त्यातच संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाचा गेला. या रस्त्यावर नगरपरिषदेतर्फ मुरुमाचे पॅचिंग केले गेले होते.
परंतु वाहतुकीचा ताण व पडणारा पाउस यामुळे या रस्त्यावर पुन्हा पुन्हा खडडे पडत आहेत. नगरपरिषदेने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नियमानुसार 15 आक्टोबर पर्यंत डांबरीकरण करता येणार नसल्याने, त्यानंतर लगेचच डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
तसेच सातारा शहरातील सर्व रस्त्यांवर मुरम पॅचिंग गेल्या महिन्या दिडमहिन्यापासून सातत्याने सुरु आहे. श्री गणेशोत्सव आणि श्री दुर्गोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवरही रस्त्यांचे पॅचिंग केले जात आहे. नगरपरिषदेने कोणतीही पॅचिंगच्या संदर्भात दिरंगाई केलेली नाही. नगरपरिषदेचे प्रयत्न दिसुनही ज्यांना जाणवत नसतील अशा आमदारांनी व त्यांच्या बगलबच्चांनी, त्यांची नकारात्मक मानसिकता बदलावी असा जबरदस्त टोलाही सभापती मनोज शेंडे यांनी लगावला आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular