सातारा : अब हम दो नही…एक है. सातार्यात आमचेच चालते. अशी व्हिक्टरीची निशानी दाखवत खा. श्री. छ. उदयनराजे आणि श्री. छ. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारकरांना दाखवली मनोमिलनाची झलक. यावेळी सातार्यातील रनर्सची उपस्थिती मोठ्या संख्येनी होती. महाराज साहेब तुम्ही थोडी रन करा, असे म्हटल्यावर उदयनराजे हसत म्हणाले, तुम्ही सातारकरांनी एवढे पळविले आहे की, आता यापुढे पळवू नका. अशी शब्दीक कोटी केल्यावर उपस्थितांमध्ये हास्यांचे फवारे उडाले. नगरपालिका निवडणूकीत काडीमोड झालेले राजघराण्यातील मनोमिलन हे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवार दि. 26 जानेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार सातारा दौर्यावर आले होते. त्यांचे पोलीस परेड ग्राऊंडवर हेलिकॉप्टरने दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी खा. श्री. छ. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे, आ. शशिकांत शिंदे हे लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते. शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर ते कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी निघाले. होते त्यावेळी खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे, आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांचे बुके देऊन स्वागत केले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या 1111 गाडीच्या चालकाला खाली उतरविले आणि स्वतः गाडी चालविण्यास बसले. शिवेंद्रसिंहराजे बाजूला शरद पवार, मागे उदयनराजे आणि त्यांच्या बाजूला शशिकांत शिंदे असे चार नेत्यांनी एकाच गाडीतून एकत्रित कार्यक्रम स्थळी गेले. ही चर्चा सुरू असतानाच सातारा रनर्स फाँडेशनच्या वतीने सातारा हिल मॅरेथॉन मार्गावर येवतेश्वर जवळ रोज सराव करणार्या धावपट्टूंसाठी शुध्द पाणपोई, रनर्स पॉईंट विकसीत केला आहे. त्याचे उद्घाटन आज रविवार दि. 27 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खा. श्री. छ. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थित जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. या कार्यक्रमानंतर दोन्ही राजेंनी व्हीक्टरीफ निशाणी दाखवत अब हम दो नही…एक हैफ असा संदेश सातारकरांना दिला. पालिका निवडणूकीत सातार्याच्या राजघराण्यातील काडीमोड झालेल्या मनोमिलन पुन्हा जुळलं अशी खंमग चर्चा सातारा शहरात सुरू आहे.
खा. उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंनी दाखवली मनोमिलनाची झलक
RELATED ARTICLES