सातारा : मराठा बिझनेसमन फोरम सातारा व कंग्राळकर असोसिएट्सच्या वतीने मराठा उद्योजक पुरस्कार व पदग्रहण समारंभ रविवार दि. 9 रोजी आयोजित केला आहे.
या सोहळ्यास विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. या कार्यक्रमास राजमाता जिजाऊ यांचे वंशज व छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक प्रा. नामदेवराव जाधव, मराठा बिझनेस फोरमचे कार्यकारी अध्यक्ष अरुणराव पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रविवार दि. 9 रोजी सकाळी 11 ते 2 वाजता देविका मंगल कार्यालय वाढे फाटा येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांनी केले आहे.
मराठा बिझनेसमेन फोरम सातारा जिल्हा ही मराठा व्यवसायकांनी एकत्र येऊन उभी केलेली संघटना आहे. या संघटनेमध्ये तत्व निष्ठेने काम करणारा मराठा व्यवसायिक हा स्वतःची प्रगती तसेच आपल्या मराठा बांधवांच्या व्यवसाय वृद्धीसाठी, व्यावसायिक घडवण्यासाठी, त्यांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी एकत्र येत आहे. मराठा बिजनेस फोरम या व्यासपीठावर आपल्या मराठा समाजातील सर्व व्यावसायिकांना एकत्र येण्याचे आपण आवाहन करतोय जेणेकरून एक संघटनात्मक प्रेझेंटेशन घेऊन आपल्याला प्रशासन तसेच जागतिक लेव्हल ला जाता येईल. काही नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी कोण कोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत हा सुद्धा आपण अभ्यास या व्यासपीठावर करतोय. उपलब्ध असणार्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय घडवण्यासाठी त्या त्या व्यवसायिकांना प्रशिक्षण व सर्व प्रकारचा सपोर्ट या व्यासपीठावर दिला जाईल.
त्याची सुरुवात म्हणून आपण येत्या रविवारी 9 एप्रिलला सकाळी 11 ते 2 या दरम्यान देविका मंगल कार्यालय वाढे येथे मा. नामदार अजित दादा पवार विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत एम बी एफ फोरमचे पदग्रहण व मराठा उद्योजक पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमासाठी अण्णासाहेब पाटील, विकास महामंडळ व सारथी या संस्थेचे अधिकारी मराठा समाजाला मार्गदर्शनासाठी येत आहेत. शासनाच्या निरनिराळ्या योजना ते आपल्याला समजावून सांगतील तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. यासाठी तुमची उपस्थिती प्रार्थनीय असून अधिक माहितीसाठी 75 6288 6288 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सातार्यात दि. 9 रोजी मराठा उद्योजक पुरस्कार व पदग्रहण समारंभ
RELATED ARTICLES