खटाव : खटाव तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून सार्वजनिक बांधकाम तथा महसूल ,मदत ,पुनर्वसन ,कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मायणी येथे विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी व मेळाव्यासाठी म्हसवड येथुन येत असताना मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावरती खटाव सकल मराठा समाजाने सार्वजनिक बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह विविध पदाधिकार्यांच्या गाड्यांचा ताफा
आडवुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्याचप्रमाणे आंदोलकांवरील खोटया केसेस मागे घेण्यात याव्यात
यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले,
यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.