पाटण :- महाराष्ट्र शासन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या कर्ज योजनेसाठी राष्ट्रीय व सहकारी बँकाकडून या योजनेच्या कर्जासाठी जाचक अटी लावून कर्ज नाकारली जात आहेत. या संबधी पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने बँकांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला आहे. तसेच आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन आलेली कर्ज प्रकरणाची कारवाई आठ दिवसात झाली नाहितर बँकेसमोर तीव्र आंदोलन करून टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महा मंडळाकडून मराठा समाजातील बेरोजगार युवकांना उध्दोग व्यवसाय निर्मिती साठी विना तारण व्याज परतावा कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेतील कर्जासाठी अर्ज केलेल्या बेरोजगारांना राष्ट्रीय आणि सहकारी बँकाकडून या योजनेतील नियम बाह्य अटी लादून व अडवणुक करुन कर्ज देण्यास नाकारले जात आहे. मराठा बांधवांची अशी शेकडो प्रकरणे बँकेत धुळ खात पडली आहेत. या बँका कडून मराठा समाजाची एकप्रकारे पिळवणुक होत आहे. बँकेकडून मराठा बांधवांना होत असलेल्या त्रासा बध्दल पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील व्यवस्थापकांना निवेदन देऊन जाब वीचारण्यात आला. तसेच आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन आलेली कर्ज प्रकरणाची कारवाई आठ दिवसात झाली नाहितर बँकेसमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने देण्यात आला आहे.
यावेळी पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यशवंतराव जगताप, गोरख नारकर, जयवंतराव सुर्वे, सुरेश पाटीर, चंद्रहार निकम, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, मंगेश पाटणकर, दिपक मांडवकर, शिवाजीराव कोळेकर, चंद्रकांत मोरे, राजेंद्र जाधव, आनंद आर्डे, अनिल निकम यांच्यासह मराठा समाजातील बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.