मायणी ( दि.१४) प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात चालू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात इतर समाज कंटकांनी सहभाग घेऊन मराठा आंदोलन चिघळवून मराठा समाजास बदनाम केले जात आहे .तसेच या मोर्चाच्या रक्षणासाठी असलेले पोलीस दल देखील त्यात भक्ष्य केले जात आहे.त्याचा निषेध म्हणून मायणी तालुका खटाव येथील मायणी शहर शिवसेना प्रमुख सचिन शामराव माने यांनी१५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे .
सदर आशयाचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक वडूज , सपोनि मायणी यांना दिले असून सदर निवेदनामध्ये दिलेली माहिती याप्रमाणे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या चाललेल्या आंदोलनात इतर समाजकंटकांनी सहभाग घेऊन सदर आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न केल्याने मराठा समाज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात बदनाम होत आहे .शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात राहणे लज्जास्पद वाटू लागल्याने या सर्व गोष्टींना कंटाळून दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी मी आत्मदहनाचा निर्णय घेतला होता .मात्र या संदर्भात मायणी पोलीस विभाग व मायणीच्या पत्रकारांच्या समुपदेशाने सदर निर्णय मी मागे घेतला होता .मला ही आशा होती की या गोष्टींवरती काही तरी तोडगा निघेल .परंतु औरंगाबादमधील वाळूज येथील तोडफोड प्रकरणामुळे पुन्हा एकदा माझ्या समाजाला सतत बदनाम करण्याचे कारस्थान सुरू झाले आहे.
म्हणून १५ ऑगष्ट या स्वातंत्र्यदिनी मायणीच्या चांदणी चौक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला आपण बसण्याचा निर्णय घेतला आहे .या गोष्टीवरती प्रशासनाने त्वरित गांभीर्याने पावले उचलावीत अशी माझी अपेक्षा आहे .याही वेळी जर माझी निराशा झाली तर मात्र आपणच मला इच्छा मरण पत्करण्याची परवानगी द्यावी .