Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपाटण येथे दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलनात कोयना, मोरगिरी विभागातील मराठा बांधवांचा...

पाटण येथे दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलनात कोयना, मोरगिरी विभागातील मराठा बांधवांचा ठिय्या ; शनिवारी पाटण, कुंभारगाव विभागातील मराठा बांधव करणार ठिय्या

पाटण:- पाटण येथे ९  ऑगस्ट पासून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील कोयना, मोरगिरी विभागातील मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी शेकडो मराठा बांधव विद्यार्थी- नागरीक यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला. तर शासनाला देण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्यासोंबत पाच हजार सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांचा व नागरीकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. तर या ठिय्या आंदोलनास सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले यांनी भेट दिली.
दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनात सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, पाटण नगरपंचायतीचे उपाध्यक्ष दिपक शिंदे, नगरसेवक अजय कवडे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आयेशा सय्यद, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, अविनाश जानुगडे, धर्यशिल पाटणकर, संजय इंगवले, चंद्रहार निकम, मंगेश सुभाष पवार, राजेंद्र मोरे, संतोष चव्हाण, विनोद पाटणकर, पत्रकार विक्रांत कांबळे, जालिंदर सत्रे, शंकर मोहिते, नितीन खैरमोडे, विद्या म्हासुर्णेकर, अनिल भोसले कोयना विभागातून हरिष भोमकर, नानासाहेब गुरव, दयानंद नलवडे, शिवेंद्र भोसले, बाळासाहेब कदम, राहुल शेलार, देवेंद्र शेलार, प्रशांत कदम तर मोरगिरी विभागातून मोरणा विभाग संघटना विनोद सांवत, जयवंत सुर्वे, शंकर मोरे, लक्ष्मण वरेकर, विलास मोरे, पंढरीनाथ मोरे, विठ्ठल गालवे, संदिप पाटील, शिवाजी साठे, सचिन शिर्के, आदी शेकडो मराठा समाजातील बांधवांनी पाटण तहसील कार्यालयासमोर बसून आंदोलन केले.
यावेळी महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात देण्यात येणाऱ्या निवेदनाबरोबर पाच हजार मराठा बांधव, महिला – भगिनी, युवा – युवती, नागरीक यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहेत. तर शनिवारी पाटण – रामापूर, कुंभारगाव येथील मराठा समाजातील नागरिकांचा ठिय्या आंदोलन होणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular