कराड : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकांनी लिहिले, सांगितले आहे. शिवाजी महाराजांशी कोणालाही बरोबरी करता येणार नाही. शिवाजी महाराजांना त्यांच्या काळात अनेक शिलेदारांनी मोठी साथ दिली. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुतीही दिली. महाराजांच्या ऐका शब्दावर अनेक जण प्राणाची आहुती देण्यासाठीही तयार होते.
अशा अनेक शिलेदारांचा इतिहास जनेतेसमोर आणण्याचे प्रयत्न क्षत्रिय मराठा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने होणार आहे. या प्रतिष्ठानची नुकतीच करवडी बैठकही झाली.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आहे. स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज सचिन सरनोबत व इतिहास अभ्यासक, शस्त्र संग्राहक संदीप उर्फ नानासाहेब सावंत, कोल्हापुर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जितेंद्र आबासाहेब डुबल-इनामदार (करवडी )भैय्यासाहेब जगदाळे मसुर कुणालसिंह निंबाळकर यड्राव, अमरसिंह थेारात वाळवा, महेश निंबाळकर पुणे, केतन डुबल इनमदार, वीरसेन भोसले. पाटील कापुसखेड इतिहास संशोधक नानासाहेब सर्व कोल्हापुर यंाची उपस्थिती होती. त्यांनी या वेळी व्यक्त केली.
बैठकीत क्षत्रिय मराठा घराण्यांचा अपरिचित इतिहास, त्याचबरोबर येणार्या काळात क्षत्रिय मराठा समाजाचे संघटन करण्यासंदर्भात प्रयत्नशील राहण्याच्या सुचना करण्यात आल्या. बैठकीच्या निमित्ताने अनेक प्रसिध्द घराण्यांच्या वंशावळ व त्यावर चर्चा झाली. अमित फाळके यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अनिकेत डुबल. इनामदार यांनी स्वागत केले. संजय साळुंखे – पाटील यांनी प्रास्ताविक केले.
छत्रपतींच्या शिलेदारांचा इतिहास लोकांसमोर येणार क्षत्रिय मराठा प्रतिष्ठानचा पुढाकार
RELATED ARTICLES