कराड : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकांनी लिहिले आणि सांगितले आहे. शिवाजी महाराजांशी कोणालाही बरोबरी करता येणार नाही. शिवाजी महाराजांना त्यांच्या काळात अनेक शिलेदारांनी त्यांना मोठी साथ दिली. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुतीही दिली. शिवाजी महाराजांच्या एकेका शब्दावर अनेकजण मरण्यासाठीही तयार होते. अशा अनेक शिलेदारांचा इतिहास जनतेसमोर आणण्याचे प्रयत्न क्षत्रिय मराठा प्रतिष्ठान करीत आहे. नुकतीच या प्रतिष्ठानची बैठक सातारा जिल्ह्यातील करवडी (ता.कराड ) संपन्न झाली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले. स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज सचिन सरनोबत (ईश्वरपूर) व इतिहास अभ्यासक, शस्त्र संग्राहक संदीप उर्फ नानासाहेब सावंत, (कोल्हापूर) यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
जितेंद्र उर्फ आबासाहेब डुबल इनामदार (करवडी), भैय्यासाहेब जगदाळे सरकार (मसूर), कुणालसिंह निंबाळकर (यड्राव), अमरसिंह थोरात सरकार(वाळवा), महेश निंबाळकर (पुणे), केतनदादा डुबल-इनामदार, वीरसेन भोसले पाटील(कापूसखेड) इतिहास संशोधक अभ्यासक नानासाहेब सावंत(कोल्हापूर) यांची मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केले. अमित फाळके यांच्या हस्ते सत्कात करण्यात आला. अनिकेतदादा डुबल-इनामदार यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साळुंखे- पाटील यांनी केले.
या बैठकीमध्ये क्षत्रिय मराठा घराण्यांचा अपरिचित इतिहास , त्याचबरोबर येणार्या काळामध्ये क्षत्रिय मराठा समाजाचे संघटन करण्यासंदर्भात प्रयत्नशील राहण्याच्या सूचना करण्यात आल्या, बैठकीच्या निमित्ताने अनेक प्रसिद्ध घराण्यांच्या वंशावळ व त्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यांमधून बहुसंख्य क्षत्रिय मराठा वंशज उपस्थित होते.
छत्रपतींच्या शीलेदारांचे वंशज एकवटले; क्षत्रिय मराठा प्रतिष्ठानची बैठक उत्साहात
RELATED ARTICLES

