(अजित जगताप)
सातारा दि: महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये चर्चेचा विषय असलेल्या मराठा आरक्षणाबाबत आज छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरातील शिवतीर्थावर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्याच्या वेळीच हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून अधिकार मिळावे. त्यांच्या भविष्यासाठी आंदोलन होत आहे. बघता काय सामील व्हा…. मराठ्यांची एकच मागणी ५० टक्के च्या आतील ओबीसी प्रवर्गातून टिकाऊ आरक्षण…. जो घरात बसला तो मराठा कसला… बापाला दुष्काळ जगू देत नाही आणि मुलाला आरक्षण शिकू देत नाही…. एक दिवस आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी… असं फलक लावून हे आंदोलन शिवतीर्थ म्हणजे पोवई नाका या ठिकाणी करण्यात आले.
या वेळेला मराठा समाजातील सौ. वैशाली जाधव, सौ .सुवर्णा पाटील, सौ. तेजस्विनी केसरकर, ओमकार देशमुख, हर्षल शिंदे, अतुल शिंदे यांच्यासह मराठा समाजातील स्वाभिमानी युवक शांततेने नाक्यावर उभे होते. त्यांच्या हातातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार असे सांगून त्यांना हुसकावून लावले. त्यानंतर स्वागत कमानीचा फलकही काढण्यात आला. उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारच्या दौऱ्यानंतर आता शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचा सातारा येथे दौरा होत असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एकच मिशन मराठा आरक्षण असा जयघोष करत सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेले आहे. त्याला आता भाजपमधीलच काही लोक प्रत्युतर देण्याच्या तयारीत आहेत. काल कोरेगाव येथे झालेल्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थन करणारे भाषण करून वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या मराठी बांधवांना मार्गदर्शन केले. त्यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाल्याचे दिसून येत आहे..
———————————————
फोटो सातारा येथील शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलन (छाया- अजित जगताप, सातारा)
साताऱ्यात शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी मुक आंदोलन…
RELATED ARTICLES