म्हासुर्णे: मराठा समाजाचे जात पडताळणी दाखले काढण्याची प्रक्रिया किचकट आहे, त्यामुळे चालु शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याच्या प्रवेश प्रक्रियेत (एस.ई.बी.सी) अंतर्गत अॅडमिशनसाठी आपल्या कार्यालयांकडून दाखले दिले जात आहेत.
परंतु सध्या दाखले देण्याचा कालावधी पंचेचाळीस दिवसाचा आहे,
तरी यात सुधारणा करुन शैक्षणिकदृष्ट्या आवश्यकता असल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्याचे दाखले आठ दिवसाच्या आतमध्ये देण्याची व्यवस्था करण्यांत यावी अशी मागणी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दशरथ पिसाळ खटाव तालुका युवक अध्यक्ष राजु पिसाळ, विठ्ठल पिसाळ, सुजन पिसाळ, सुयश पिसाळ आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

                                    