Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमारुतीकारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

मारुतीकारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

कातरखटाव : कातरखटाव-वडूज रस्त्यावरील कुंभारमळवी पुलावर दुचाकी व चार चाकी यांच्या समोरासमोरील धडकेत कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील सागर दिलीप पवार (वय 22) हा जागीच ठार झाला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, येथील प्रकाश सुभाष काशीद यांचा मेव्हणा सागर पवार हा त्याच्या लग्नाच्या लग्नपत्रिका वाटप करून कातरखटाव येथे येत असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल क्र. एम एच 11 सीसी 7491 वरून कातरखटाव कडे येत होता. त्या दरम्यान कुंभारमळवी पुलावर वडूज कडे जाणारी चार चाकी क्र. एम एच 43 आर 0832 यातील चालक किरण अरुण नलवडे (रा. बोंबाळे ता. खटाव) याने भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येऊन सागर पवार याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दरम्यान चार चाकी वाहन चालक किरण नलवडे हा घटनास्थळावरून पळून गेला. अपघातामध्ये सागर पवारच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी गंभीर जखमी सागर पवार याची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे सांगितले. सदर अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून चार चाकी वाहन चालक किरण नलवडे याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पो. हवा. धनाजी वायदंडे करीत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular