सातारा : मतदान केंद्राध्यक्षांची मतदान केंद्रावर महत्वाची भूमिका असते. आपल्या आयुष्यातील अनुभव पणाला लावून मतदानाच्या दिवशी काम करा मतदानाच्या दिवशी काही अडचणी आल्यास माझ्या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क करा व मतदान प्रक्रिया सुरुळीत पार पाडा, अशा सूचना आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्षांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत होत्या. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर, तहसीलदार रोहिणी आखाडे आदी उपस्थित होते.
मतदानाच्या दिवशी काही चुका होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, मतदान केंद्राध्यक्षांसाठी आजचे प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. या प्रशिक्षणानंतर प्रत्येकला मतदान प्रक्रियेबाबत 20 मार्कांचा पेपर सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. या पेपरमध्ये पास व्हावे. मतदान प्रक्रियेत ईव्हिएम व्हिव्हिपॅट या मशिनचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. ही मशिन प्रत्येकला हाताळता येणे आवश्यक आहे. हाताळता येत नसतील तर त्या वारंवार हाताळा यासाठी मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी हलगर्जी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी तुमच्या आयुष्याचा अनुभव पणाला लावून काम करा. तुम्हाला खूप अधिकार दिले आहेत. या अधिकारांचा उपयोग मतदनाच्या दिवशी करा. तसेच ईव्हिएम व्हिव्हिपॅट मशिन वाहतुक करताना व मतदानाच्या दिवशी काळजीपूर्वक हाताळा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केल्या.
प्रास्ताविकात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख म्हणाल्या. ईव्हिएम व्हिव्हिपॅट मशिनची नागरिकांना ओळख व्हावी यासाठी सातारा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात जनजागृती करण्यात आली आहे. या मशिनच्याद्वारे मतदाराला आपण कुणाला मतदान केले आहे हे 7 सेकंदसाठी दिसणार आहे. यामुळे मतदाराच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही, असे प्रास्ताविकात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांनी सांगून मतदान केंद्राध्यक्षांची जबाबादारी व कर्तव्याची माहिती सांगितली.
या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदान केंद्राध्यक्षांची मतदान केंद्रावर महत्वाची भूमिका ; मतदानाच्या दिवशी अडचण आल्यास थेट संपर्क साधाः जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES