फलटण (शक्ती भोसले) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण नगरीत येत आहे. फलटण नगर परिषदेच्या वतीने पाणी , आरोग्य , वीज , पालखी तळ आदींची कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सोयी सुविधांची कामे वेगाने करण्यात आली असून फलटण नगरी माऊलीच्या स्वागतासाठी सज्ज झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवारी एका दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण नगरीत येत आहे . पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नगर परिषदेकडून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत . पाणी पुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा योजना असणा-या येथील सर्व इले . मोटर्सची तसेच सर्व टाक्या व व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यात आला आहे . पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक सामुग्री , खरेदी करण्यात आली आहे . पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक क्लोरीन वायू , तुरटी खरेदी करण्यात आली आहे . आरोग्य विभागाच्यावतीने वतीने सर्व सार्वजनिक शौचालये दुरुस्ती व साफसफाई करण्यात आली आहेत . पालखी काळात गटारावर जंतू नाशक पावडर फवारणी करण्यात येत आहे. विद्युत विभागाच्या वतीने पालखी तळ, पालखी मार्ग व शहरातील सर्व रोडलाईट्सची दुरुस्ती करण्यात आली आहे . तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वीज दिवे बसवण्यात आले आहेत. पालखी सोहळा ठिकाणी दर्शनबारी आवश्यकतेनुसार दर्शनबारीसाठी बेरिकेट करण्यात आले आहे.
सार्वजनिक स्वच्छतेअंतर्गत आरोग्य विभागाने गावठाणमधील रस्त्याकडेची झाडेझुडपे काढण्यात आली आहेत. खुल्या जागेतील स्वच्छता करून या जाग्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. माऊलींचा मुक्काम असणा – या पालखी तळावरील स्वच्छता काम पूर्ण झाले असून पालखी तळावर स्नानगृह तयार करणे, दर्शन रांग तयार करणे, लाईटसाठी मनोरे उभारणे अशी कामे सुरू आहेत. पालखी तळावर पालखी आगमनापासून ते पालखी बरडकडे मार्गस्थ होईपर्यंत 24 तास 40 सार्वजनिक नळ उभे करुन पाणी चालू करणेत येत आहे. पालखी कालावधीत 9 रुग्णवाहिका सह 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. पालखी तळावरील सर्व कचरा एकत्र करुन दररोज उचलण्यासाठी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय पालखी तळावर मदत केंद्र, आरोग्य विभाग , दवाखाना , पोलिस मदत केंद्र, अग्निशमन सेवा या सर्व अत्यावश्यक बाबीचे नियोजन केले आहे. पालखी सोहळ्याला पाणी पुरवठा करण्यासाठी खजिना हौद, भडकमकर नगर,जलशुद्धीकरण केंद्र या 8 फिडींग पॉईंट ठिकाणी टॅकर भरण्याची 24 तास कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 27 शासकीय टँकर उपलब्ध करण्यात आले आहेत तसेच आवश्यकतेनुसार खाजगी टँकर द्वारे 500 टँकर खेपाचे नियोजन करण्यात आले आहे. निरा उजवा कालव्यातून 29/6/10 ते 12/7/19 दरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 24000 हजार लि रॉकेल व 4000 गॅस सिलेंडर टाक्या मुक्कामाच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरात विविध जंतुनाशक फवारणीचे काम चालू करण्यात येत आहे. निर्मलवारी या संकल्पनेतून फलटण शहरामध्ये पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी 1000 चराचे शौचालय तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणार आहेत.
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज
RELATED ARTICLES