Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकेळघर घाटात दरीत कोसळली कार

केळघर घाटात दरीत कोसळली कार

केळघर: केळघर (ता.जावली) घाटातील काळाकड्या नजिकच्या एका वळणारुन घाट चढून महाबळेश्वरकडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक- एम.एच.08- 7343 ही चालकाचा ताबा सुटून 200 फूट दरी कोसळली. तर केवळ नशिब बलवत्तर होते म्हणून पाच जण जखमी झाले.


सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की, कराडहून एका लग्नाचा कार्यक्रम आटोपून दापोलीकडे जात असताना केळघर घाटात रेगंडी गावच्या हद्दीतील काळाकडानजिक एका वळणावर घाट चढत असताना चालकाचा ताबा सुटून जवळपास 200 फूट खोल दरीत ही कार कोसळली. यामध्ये बाळू भालचंद बळगद वय 48 वर्षे (चालक), राकेश सोहनलाल माळी वय 26 वर्षे, मनोहर मोतीलाल जैन वय 58 वर्ष, मीना मनोहर जैन वय 52 वर्षे, युवराज संकेत जैन वय 16 महिने हे जखमी झाले.
अपघात झाल्यानंतर ये- जा करणार्‍या प्रवाशांनी तातडीने मेढा पोलीस स्टेशन, रुग्णवाहिका, महाबळेश्वर ट्रेकर्स यांना दूरध्वनीवरून माहिती देऊन तातडीने जखमींना दरीतून वर काढले. तर 16 महिने जखमी युवराजला सुधाकर दुंदळे व इतर शिक्षकांनी आपल्या वाहनातून प्रथम केळघर प्राथमिक आरोग्य केंद्र नंतर मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सातारला हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular