Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमेढा शहर पूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज

मेढा शहर पूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज

मेढा ( वार्ताहर ) मेढा नगरीत आजुबाजुची गावातील नागरीकांची भरपूर प्रमाणात ये- जा वाढल्याने मेढा नगरीतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून मेढा शहर पुर्णपणे लॉक डाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मेढा गावापासून काही अंतरावर म्हाते मुरा, निझरे हे गाव असून सध्या या आजुबाजुच्या परिसरातील नागरिक भरपूर प्रमाणात माल घेण्याकरीता येत असून यामुळे मेढा नगरीतील नागरीकांच्या जीवाला धोका  निर्माण झाला आहे. बाजारपेठेत नक्की काय
नियम पाळले जातात हे देखील अनुत्तरीत असून व्यापारी वर्ग सॅणिटायजर चा वापर करतात का ? हे देखील बाघितले पाहिजे. नगरपंचायतीने अधिकृत भाजीपाला विक्रेते यांना विक्रीकामी जागा नेमून दिल्या खऱ्या परंतु या विक्रेते व्यतीरिक्त ज्यांचेकडे परवाना नाही त्या विक्रेत्यांनी आपल्या स्वमालकिच्या गाडीमधून भाजीपाला विक्री सुरू ठेवली आहे. बाहेरून माल विक्रीकामी येणाऱ्या विक्रेत्यांची ही वर्दळ वाढली आहे.
सर्वसामान्य असणारी मेढा नगरी आता मात्र चांगलीच कावली असून नागरीकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाल्याने मेढा शहर लॉक डाऊन करण्याच्या हलचाली सुरू झाल्या असून या बाबतचे पत्र मा . जिल्हाधिकारी सो यांना मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका,  यांनी दिले असून मेढा शहर दिनांक २५ एप्रिल ते ३ मे २०२० अखेर लॉक डाऊन केले जाणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular