मेढा : मेढा येथे अनाधिकृत बांधकाम होत असल्याची माहिती मिळताच मेढा नगरपंचायतीच्या वतीने बांधकाम थांबविण्याच्या नोटीसा बांधकाम मालकांना देवून जोरदार दणका दिला आहे
मागील काही दिवसांपासून मेढा नगरीतील अनाधिकृत बांधकाम विषय सर्वासमोर आला होता . सदरच्या बातमी विषयातून मेढा परिसरातील बांधकामांचा सव्हें करण्यात आला आणि त्यातून काही माहिती नगरपंचायतीला मिळाली . मेढा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाचा वेग वाढल्याचे निदर्शनास आले त्यामुळे मेढा नगरीच्या नगराध्यक्षा सौ द्रोपदा मुकणे , बांधकाम सभापती विकास देशपांडे सध्याचे मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी अनाधिकृत बांधकाम करणार्या 21 जणांना नोटीसा देवून बांधकाम थांबवावे अशी सूचना केली आहे . मेढ्यात प्रथमच अशी दमदार प्रक्रिया झाल्याने नागरिकांना न्याय मिळणार का ? ही शंका दुर झाली आहे . या दणकयाने अनाधिकृत बांधणार करणार्यांना मात्र चांगली चपराक बसून त्यांचे धाबे दणाणले आहेत. काही ठिकाणी जमिन एकाच्या नावावर बांधतोय दुसरा अशी अवस्था आहे .बांधकाम परवानाच्या नियमाला फाटा देवून इमारत बांधकाम चालू आहेत हि मुजोरी त्यामुळे थांबणार आहे .तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना इमारत बांधकाम करीता पाणी मिळावे म्हणून बोअर काढण्याचा सपाटा सुरु आहे. याची परवानगी व नोंदी संबंधित खात्याकडे केली जाते की नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या बांधकामाबाबत नगराध्यक्षा सौ द्रौपदा मुकणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जनतेची काम करण्यासाठी माझी निवड झाली असून सकारात्मक कामकाज करून मेढा नगरपंचायतचे कामकाज पाहताना आलेल्या अडीअडचणी सोडवून नागरीकांना न्याय मिळवून देईन तर बांधकाम सभापती विकास देशपांडे यांनी ही अनाधिकृत बांधकामांना आळा बसणे गरजेचे असून येथून पुढे नगरपंचायत कार्यक्षेत्रात बांधकाम करताना नगरपंचायतीची परवानगीचा विसर कोणाला पडू नये असे सुचित करून यापुढेही केंद्रात व राज्यात असणार्या भारतीय जनता पार्टी च्या सरकार च्या माध्यमातून विविध विकास कामं मेढा नगरीसाठी करनार आहे. गावांतील स्वागत कमान .ते चांदणी चौक दोनी बाजू बंदिस्त गटार व खडीकरण डांबरीकरण 52 लाख नगरोत्थान मधून व मेनरोड ते गांधीनगर बाबू वामन पवार यांचे घरापर्यंत खडीकरण डांबरीकरण व एक साईड बंदिस्त गटार18 लाख निधी मंजूर करून आणला आहे. व्यापारी संकुल व नगरपंचायत कार्यालय, स्मशानभूमी चे प्रश्न लवकरच मार्गी लागण्यासाठी सर्व सन्माननीय नगराध्यक्ष व नगरसेवकांना बरोबर घेवुन काम करीत असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी नगरपंचायतीकरिता घेतलेला निर्णय योग्य असून त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेे.
सत्तेचा दुरुपयोग करून काहीही करता येते अशी भावना काही सामाजिक कार्यकर्त्यांना झाली होती परंतु मेढा नगरपंचायतीने वेळीच लक्ष घालून काम बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून अनाधिकृत बांधकाम करून बांधकामे, खोदकाम याच्या माध्यमातून जमिनीचे उत्खनन करून सरकारी कार्याचा बोजवारा उडविणार्या व तिचा उपयोग स्वतःसाठी करणार्या या मालकांकडून मेढा नगरपंचायत रॉयल्टी घेणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.