Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदिवड येथील 12 रोजी श्री म्हसोबा देवाची यात्रा

दिवड येथील 12 रोजी श्री म्हसोबा देवाची यात्रा

म्हसवड : दिवड (ता.माण) येथील श्री म्हसोबा देवाची यात्रा मंगळवार दि. 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होत असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे अशी माहिती यात्रा कमिटी व दिवड ग्रामस्थांनी यांनी दिली आहे.
मंगळवार दि.12 रोजी सकाळी 9 वा. मश्रींफ चे पुजन करण्यात येणार असून रात्री 9 वा. संजय महाजन यांचा आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ जळगाव यांचा तमाशा होणार आहे. बुधवार दि.13 रोजी दुपारी 2 वा. कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. योगेश बोंबाळे व पै. विष्णू खोसे यांची एक लाख रुपये इनामाची कुस्ती ही कुस्ती कै. खाशाबा सावंत यांच्या स्मरणार्थ श्री गंगाराम सावंत यांच्या तर्फे दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती पै. उमेश शिरतोडे व पै.श्रीपती कर्णावर यांची 75 हजार रुपये इनामाची कुस्ती ही प्रकाश सावंत , यशवंत सावंत व काका सावंत यांच्या तर्फे , तिसर्‍या क्रमांकाची कुस्ती पै. सुबोध पाटील व पै. सुरज मुलाणी यांची 50 हजार रुपये इनामाची ही कुस्ती अशोक सावंत ( शेठ ) व कै. ज्ञानदेव सावंत यांच्या स्मरणार्थ दिगांबर सावंत यांच्या तर्फे , चौथ्या क्रमांकांची कुस्ती स्थानिक पै. भावेश सावंत व पै. सचिन पाटील यांची 50 हजार रुपये इनामाची यात्रा कमिटीच्या वतीने , पाचव्या क्रमांकांची कुस्ती पै.महादेव माने व पै. रुषिकेश लांडे यांची 50 हजार रुपये इनामाची कै. दिगांबर सावंत यांच्या स्मरणार्थ डॉ. विलास सावंत यांच्या तर्फे , सहाव्या क्रमांकाची कुस्ती पै. विशाल कोकरे व पै. अभिषेक पवार यांची 50 हजार इनामांची कै.शिवाजी जाधव यांच्या स्मरणार्थ चि. धनाजी शिवाजी जाधव यांच्या तर्फे लावण्यात आल्या आहे. यावेळी इतर अनेक चटकदार कुस्त्या होणार आहेत.
सायंकाळी 9 वाजता झंकार आर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी दि.14 रोजी यायंकाळी श्रींची मिरवणुक ( छबिना ) काढण्यात येणार आहे .या सर्व कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील शौकिनांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular