म्हासुर्णे (प्रतिनिधी -तुषार माने) :-महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे त्यातच सातारा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसुन येत आहे.दिवसेंदिवस सातारा जिल्ह्यात रुग्णांचा संख्या वाढत असल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात 25 मे 1 जुन पर्यत कडक निर्बंध घातले आहेत.त्या अनुशंगाने मायणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक शहाजी गोसावी साहेब यांनी म्हासुर्णे दक्षता कमेटीची मिटींग लावली होती. यावेळी साहेबांनी दक्षता कमेठीस गावातील दुकाने,विनाकारण फिरणारे लोक, तसेच जिल्हाअधिकारी यांनी घातलेले कडक निर्बंध यांचे काटेकोरपणे पालन करण्यास दक्षता कमेठीस सुचना दिल्या.व नियम मोडणार त्यांच्या वर कारवाई करा.दंड वसुल करण्याच्या सुचना दिल्या. मिटींग साठी गावात आल्यानंतर गावातील दुकाने उघडी दिसताच क्षणी दुकानदार यांच्या वर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे साहेबांनी कारवाई केली.तब्बल एकाच वेळी सहा दुकानदावर कारवाई करण्यात आहे.लॉकडावुन मध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणत कारवाई म्हासुर्णेत झाल्यामुळे दुकानदार व ग्रामस्थ नियमांचे पालन करतील अशी आशा आहे .पण जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या वर कारवाई पुन्हा होवु शकते असे मायणी पोलीस उपनिरिक्षक शहाजी गोसावी साहेब यांनी सांगितलं या बैठकीस सरपंच सचिन माने ,उपसरपंच विठ्ठल माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,सिकंदर मुल्ला,सुहास माने,आबा यमगर,संगिता गुरव,तृप्ती थोरात,मा.उपसरंपच अजित माने,विठ्ठल माने,पंढरीनाथ तुपे,प्रविण चव्हाण,चंद्रकांत यमगर,पोलीस कॉनस्टेबल कारंडे साहेब,सानप साहेब व म्हासुर्णे ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते