म्हसवड : वळई ता.माण येथील विधवा महिला शालन औंदुबर आटपाडकर वय-35हिचा प्रियकर भाऊसाहेब उर्फ मुलेश काळेल याने म्हसवड हद्दीतील नागोबा मंदिर परिसरातील झाडीत खुन केल्याचा छडा म्हसवड पोलिसांनी लावला असून, दोन महिण्यापुर्वी खुन केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी वळई ता माण येथील रामा ज्ञानू काळेल यांची मुलगी शालन औंदुबर आटपाडकर हिचे लग्न विठलापूर ता.आटपाडी जि.सांगली येथील औंदुबर आटपाडकर यांचेशी झाले होते. मात्र 4वर्षी पुर्वी पतीचे निधन झाल्याने शालन ही वडिलांकडे माहेरी मुलगी श्रेया आटपाडकर वय-9व श्रेयश आटपाडकर वय5 मुलांना घेऊन राहात होती.
गत वर्षी पासून जांभुळणी ता माण येथील भाऊसाहेब उर्फ मुलेश बाबा काळेल वय 34यांची शालनशी ओळख झाली होती.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.आरोपीचे वळई येथील शालनच्या घरी येणे जाणे होत होते.दरम्यान आरोपीचे व मयत शालन यांच्या मध्ये भांडण होत होती. शालनचे अजूनही दुसर्या व्यक्तीशी प्रेमसंबंध आहेत.असा संशय आरोपी घेत होता.यावरून दोघा मध्ये वाद होत होता.
आरोपी याचा संशय अधिक बळावल्याने 25जानेवारी रोजी आरोपी काळेल हा मयत शालन हिस सकाळी 10:30च्या सुमारास म्हसवड भागात घेऊन आला तेथून तो नागोबा मंदीरा परिसरात घेऊन गेला व तिथेही दोघांमध्ये वादावादी झाली.आरोपीने चिडून जाऊन शालन हिच्या डोक्यात दगड घालून खुन केला.
मंगळवार 12रोजी सपोनि मालोजीराव देशमुख यांनी आरोपीचा पर्यंत ता.माण येथील मामा ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीची चौकशी करून पोलिशी खाक्या दाखवला असता आरोपी याने शालनचा खुन केल्याची कबुली दिली. सदर,प्रेताचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी हाडांचा सांगाडा, दारूच्या बाटल्या, चंदनाची लाकडं, तीन निरोध सापडले असून आरोपी भाऊसाहेब काळेल यास पोलिसानी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.
म्हसवड पोलिसांनी लावला दोन महिण्यांपूर्वीच्या खुनाचा छडा
RELATED ARTICLES