Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीम्हसवड विभागातील पोलिस पाटीलांकडून अनोख्या पध्दतीने पोलिस पाटील दिन साजरा

म्हसवड विभागातील पोलिस पाटीलांकडून अनोख्या पध्दतीने पोलिस पाटील दिन साजरा

मतिमंद मुलांच्या जिवनाला आकार देण्याचे पुण्यकर्म करणार्‍या संस्थेस मदत प्रेरणादायी : अनिल वडनेरे
म्हसवड: मतिमंद मुलांच्या जिवनाला आकार देण्याचे पुण्यकर्म करणार्‍या संस्थेस मदत करून 51 वा पोलिस पाटील दिन साजरा करणार्‍या म्हसवड विभागातील पोलिस पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उदगार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांनी काढले.
म्हसवड पोलिस ठाण्यात 51 पोलिस पाटील दिन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांचे अध्यक्षेतेखाली साजारा करण्यात आला.
यावेळी वडनेरे यांचे हस्ते नलिनी फौंडेशन संचलित प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रच्या चेअरमन नलिनी कोळी यांना मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी सपोनि मालोजीराव देशमुख, पत्रकार पोपट बनसोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना वडनेरे म्हणाले मतिमंद मुलांच्या जिवनाला आकार देण्याचे पुण्यकर्म नलिनी फौंडेशन संचलित प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रच्या चेअरमन नलिनी कोळी करत आहेत. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असून खर्या अर्थाने मतिमंद मुलांना मदत करून 51वा पोलिस पाटील दिन साजरा करून म्हसवड विभागातील पोलिस पाटील संघटनेने समाजासमोर आदर्श ठेवला असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना सपोनि मालोजीराव देशमुख यांनी पोलिस पाटील बंधू भगिनींना 51 व्या पोलिस पाटील दिना निमित्त शुभेच्छा देऊन पोलिस पाटील संघटनेने मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रास मदत करून सतपात्री दान करून पोलिस पाटील पदाचा दर्जा उंचावला असल्याचे सांगून, नलिनी फौंडेशन संचलित प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रास पोलिसांच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले. तर नलिनी कोळी यांनी पोलिस पाटील बंधू भगिनींनी केलेली मदत निश्चित प्रेरणादाई असून संस्थेला बळ देणारी असून 64 मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन करत असताना समाजाने मदत करणे आवश्यक आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular