सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरात पत्रकारितेच्या चांगल्या बाजूने अनेकांचे नेतृत्व अबाधित राखले आहे. परंतु, सध्याचे सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत वेळेचे बंधन न पाळल्याने साताऱ्यातील काही पत्रकारांनी पत्रकार परिषदेला बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. असा निरोप सातारा माहिती कार्यालयातून देण्यात आला होता. या पत्रकार परिषदेसाठी जिल्ह्यातील वृत्तवाहिनी व वृत्तपत्राचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. अगदी वेळेत राधिका रस्त्यावरील सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या शेजारी शिवतेज हॉल बाहेर शामियान्यात पत्रकार थांबले होते. पालकमंत्री त्याठिकाणी आले परंतु त्यांनी पत्रकारांकडे न पाहता सरळ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यातच धन्यता मानली. त्यामुळे पत्रकार सुद्धा पालकमंत्र्याची वाट पाहून कंटाळले. मुळातच नियोजित पत्रकार परिषद असल्याने पालकमंत्र्यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार उत्सुक होते. सातारा तालुका पोलीस ठाणे नजीक सायरनचा आवाज आल्यानंतर पालकमंत्री आले असा एकमेकांना पत्रकार निरोप देऊ लागले होते. त्यानंतर अर्धा तास वाट पाहूनही पालकमंत्री पत्रकार परिषदेला हजर न झाल्यामुळे पत्रकारांनी पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकून आपला स्वाभिमानी बाणा दाखवला. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषदेबाबत नेहमीच जागृत असतात. आदरणीय माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील या तर पत्रकारांच्या अगोदर पत्रकार परिषदेला येऊन पत्रकारांना प्रश्न व माहिती देत होत्या. त्यांचा अनुभव व त्यांचे अभ्यासी वृत्ती होती. आता तशी राजकीय नेत्यांकडे राहिलेली नाही. असेच काहींनी आपले मनोगत व्यक्त केले.आदरणीय मंत्री देसाई यांची नेहमीच पत्रकार परिषद होत असते. त्यामुळे पत्रकारांनाही पालकमंत्र्यांना भेटण्याची उत्सुकता असते पण यंदा प्रथमच पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेला वृत्तवाहिनी व वृत्त प्रतिनिधींनी बहिष्कार टाकल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
साताऱ्यात पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेवर प्रथमच बहिष्कार
RELATED ARTICLES