मेढा – एनडी आरएफ सारख्या जवानांना अपयश आल्यानंतर नकूल दुबे आता सापणार कि नाही अशी चर्चा सुरू असताना जिद्ध मनासी बाळलेल्या महाबळेश्वर ट्रॅकर्स व आ. श्री शिवेद्र सिंह राजे भोसले ट्रॅकर्स यांनी सकाळी पुन्हा प्रयत्नांना सुरुवात केली आणि त्यांना यश मिळाले. दुपारी 1.45 वाजता नकूलचा मृतदेह पाण्याबाहेर आला. याच वेळी नकूलच्या आईने हंभरडा फोडला तर नातेवाईकांनी आक्रोश केला. दरम्यान श्रध्दा कि अंधश्रध्दा परंतु मिशन सूरू करण्यापूर्वी सोडलेल्या परडी ने कमाल मेढा येथिल वेण्णा नदीवर शुक्रवार ( दि. 10 ) रोजी फार्मशी कॉलेजमध्ये शिकणार्या नकूल दुबे ( वय 21 ) याने पुलावरून वेण्णा नदीमध्ये उडी मारली होती. त्याचा शोध मावळ येथिल आलेल्या एनडीआरएफच्या जवानांनी दोन दिवस अथक परिश्रम घेवूनही काहीच हाती लागले नाही. सहयाद्री ट्रॅकर्स यांनी ही प्रयत्न केला त्यांना ही यश मिळाले नाही.
सुरूवातीपासून महाबळेश्वर ट्रॅकर्स व आ. श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रकर्स या मोहीमेमध्ये सहभागी होते त्यांनी चिकाटी सोडलेली नव्हती. नकूलने आत्महत्या करून 5 वा दिवस होता. ऑक्सीजनच्या चार बॉटल्स संपूण आणि तळापर्यत जावून ही काही हाती लागले नव्हते.
यावेळी प्रत्येक ग्रामस्थ ट्रॅकर्स, एनडी आरएफ चे जवान यांना या ठिकाणी परडी दिली की बुडलले बाहेर येते. अनेक वेळा तस कराव लागल असल्याचे सांगत होते. परंतु ती अंधश्रध्दा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आज पाचव्या दिवशी ट्रकर्सच्या तरुणांनी प्रारंभीच वेण्णा मातेच्या पात्रामध्ये श्रध्दा ठेवून परडी सोडली आणि परडीन कमाल केली. त्या परडीचा अनुभव आल्याच सांगीतल.
नकूलची आई शोभा दुबे हिचा आक्रोश शोध मोहीमेस प्रोत्साहीत करीत होता. मातेला मुलगा भेटावा म्हणून ट्रॅकर्स च्या तरूणांनी नवीन युक्तीचा वापर करण्याचे ठरविले. एका सरळ बांबुळा बोरीच्या काटया व दगड बांधून पाण्यातुन फिरण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना यश पण मिळाले आणि नकूलची बॉडी आपोआप पाण्यावर आली.
नकुल दुबे याची बॉडी सापल्याची वार्ता वार्यासारखी पसरली. तरुण, वृध्द, महिला आणि पुरुष यांनी वेण्णा नदीवर तोबा गर्दी केली. नकूल दुबे याचे आईवडील नातेवाईक उपस्थित होते. नदी तीरावरच त्याचे पोष्ट मार्टम करण्यात आले. तद्नंतर वेण्णा तिरावर शोकाकूल वातावरणात सायं. 4.40 वा. अग्नी देण्यात आला. यावेळी फार्मशी कॉलेजची मुले, शिक्षक, ग्रामस्थ आणि नातेवाईक, पोलीस विभाग यांनी नकूलला अखेरचा निरोप दिला.
महाबळेश्वर ट्रकर्स आणि आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रकर्स यांनी केल्या प्रयत्नाबद्दल अनेकांनी कौतुक करीत आभार मानले. पाच दिवसानंतर या ट्रॅकर्स मुळेच आईला मुलाचा चेहरा पाहता आला.
…अखेर पाचव्या दिवशी नकूल दुबे सापडला
RELATED ARTICLES