मेढा (प्रतिनिधी ):-काही शतकांपूर्वी जपानमधील हिरोशिमा नागासाकी शहरावर 6 ऑगस्ट रोजी झालेल्या हल्यानंतरही एक कोलमडलेला व नासधूस झालेला जपान सारखा देश शिक्षणाच्या साहाय्याने पुन्हा उभा राहिला. ‘युद्ध नको शिक्षण हवं’ ह्या संकल्पनेला घेऊन आज “आदिवासी दिवस” तसेच “ऑगस्ट क्रांतिदीन” निमित्तने साताऱ्यातील आमदार महाविद्यालय मेढा येथे ‘युद्ध नको शिक्षण हवं” ह्या विषयावर पथनाट्य सादर करीत प्रबोधन करण्याचे कार्य छात्रशक्ती संस्थेमार्फत केल्याची माहिती नक्षत्र मैत्रकूल प्रमुख संचालक जितेश पाटील यांनी दिली.
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे
विद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी सर यांच्या शुभहस्ते आणि विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
यावेळी युद्ध म्हणत असताना शिक्षणाला आपण किती प्राधान्य देतो, शिक्षणासाठी किती धावपळ करतो, शिक्षण म्हणजे पुस्तकी नसून जीवन मूल्य अन् वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यचे स्त्रोत आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्याहून पलीकडे आपल्या भारतात शिक्षणाचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे,
kg to pg विद्यार्थांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे ह्यासाठी असणारा हा आवाज आहे असे नक्षत्र उप संचालिका नेहा भोसले यांनी सांगितले.
पथनाट्य सादर करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत युद्धामुळे कसे देश आणि पिढ्या बर्बाद होतात हे सांगण्याचा प्रयत्न केल्याची माहिती भार्गव पाटील यांनी दिली.
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात “युद्ध नको शिक्षण हवं” या पथनाट्यातून सामाजिक प्रबोधन सादर
RELATED ARTICLES