Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसातारा शहरातील ६ विकासकामांसाठी ७ कोटी २० लाख आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा ;...

सातारा शहरातील ६ विकासकामांसाठी ७ कोटी २० लाख आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा ; जिल्हा नियोजनमधून मिळवला निधी

सातारा-: सातारा शहरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका लावणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून शहरातील ६ विकासकामे करण्यासाठी तब्ब्ल ७ कोटी २० लाख ५३ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी उपलब्ध झाला आहे.
पालवी चौक, गोडोली येथील मोरे घरासमोर बॉक्स कल्वर्ट करण्यासाठी ३७ लाख ४६ हजार १८० रुपये, पॅरेंट स्कुल ते पालवी चौक, गोडोली अखेर रस्ता खडीकरण करणे १ कोटी ९९ लाख ८४ हजार १९६ रुपये, पॅरेंट स्कुल ते पालवी चौक, गोडोली येथे बॉक्स कल्वर्ट करण्यासाठी ७० लाख १२ हजार ७५० रुपये, समर्थ मंदिर चौक ते रामाचा गोट ते मनामती चौक येथे रस्ता करण्यासाठी १ कोटी ९४ लाख ५१ हजार २१० रुपये निधी मंजूर झाला आहे.
कातकरी वस्ती येथील ओढ्यास संरक्षक भिंत बांधणेसाठी ९९ लाख ६१ हजार ४०५ रुपये आणि पॅरेंट स्कुल ते पालवी चौक, गोडोलीअखेर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी १८ लाख ९७ हजार ९९९ रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून मंजूर कामे वेळेत पूर्ण करा, कामे दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular