मेढा प्रतिनिधी -.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या१७ व्या वर्धापन दिनानिमित्त मेढा येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
जावली तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे वतीने जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळवाडी , आणि अंगणवाडी येथिल विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार समारंभ घेण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ज्येष्ठ पत्रकार श्री. नारायण शिंगटे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जावली तालुक्यात मनसे यांनीआपल्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली असून कार्यालय स्थापनेपासून येत्या वर्षभरात केलेले सामाजिक व जनहित कार्य कौतुकास्पद आहे.आगामी काळात निश्चित त्यांना याचा फायदा होईल असे विचार व्यक्त केले व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.युवराज पवार यांच्या मार्गदर्शना खाली विविध कार्यक्रम राबवण्यात आले असून यावेळी म.न.से. सातारा जिल्हा सचिव श्री.आश्विन गोळे , मनसे जावळी तालुका अध्यक्ष दत्ता करंजेकर श्री.अविनाश दुर्गावळे , मनसे जावळी तालुका संघटक अध्यक्ष श्री.राजेश माने , मनसे जवळी तालुका उपाध्यक्ष श्री.बबन हिरवे , मेढा विभाग अध्यक्ष श्री.गुलाबराव मर्ढेकर, मनसे मेढा शहर अध्यक्ष किरण जवळ,श्री.विजय पंडित, अविनाश साळुंखे, अद्वैत माने, अक्षय यादव, रामचंद्र पवार, अमर मर्ढेकर
आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जावली तालुक्यातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कार्यालय स्थापनेपासून आज पर्यंत आम्ही फक्त समाज कार्य केले असुन भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जावली तालुक्यात आपले स्थान बळकट करेल .
राजेश माने
मनसे जावळी तालुका संघटक