सातारा : तापमान वाढीचे परिणाम सातारकरांनी या उन्हाळ्यात अधिक प्रकर्षाने अनुभवले आहेे. वृक्षारोपण आणि संगोपन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे हरित सातारा करुन शहराचे तापमान मर्यादित ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येथील ड्रोंगो या संस्थेने प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या इच्छेनुसार एक रोप मोफत उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम आखल आहे. इच्छूकांनी आपली नोंदणी करावी . असे आवाहन ड्रोंगोने केले आहे.
आपला सातारा निसर्गरम्य आहे, हे वाक्य हळूहळू इतिहासात जमा होऊ लागले आहे. सातार्यातील तापमानाने मे महिन्यांत 42 अंश सेल्सीयसपर्यंत उडी मारली आहे. यावर्षी सातारा शहराचे सरासरी तापमान 40 अंश सेल्सीयस इतके होते. 40 अंश सेल्सीयसची मर्यादा ओलांडल्यानंतर सातारा निसर्गरम्य शहर ही बिरुदावली कशी मिरवेल, असा प्रश्न आहे.
वृक्षारोपण आणि संगोपनास चालना दिल्यास आपण आपल्या शहराचे तापमान आटोक्यात ठेवू शकतो, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून येथील ड्रोंगो या संस्थेने प्रत्येक कुटुंबाला एक रोप मोफत देण्याचा उपक्रम आखला आहे. सातारा शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना व नागरिकांचा यात सहभाग असणार आहे. जागतिक पर्यावरणदिनी म्हणजे दि.5 जून रोजी ही रोपे मान्यवरांच्या उपस्थितीत, गुरूवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यान (गुरूवारबाग) येथे नागरिकांकडे सुपूर्द केली जातील.
आंबा, पेरु, चिकू, आवळा, जांभूळ, कडीपत्ता, लिंबू, बहावा, जारुळ, वड-पिंपळ, लिंब आदी फळ-फुल झाडे तसेच जंगली झाडे ड्रोंगोकडे उपलब्ध आहेत. यापैकी कोणते झाड हवे असेल त्याची मागणी नोंदवावी. म्हणजे तेवढीच रोपे उपलब्ध करुन देण्यात येतील, असे ड्रोंगोतर्फे सांगण्यात आले. ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे, अशांना चांगली वाढ झालेली रोप मोफत मिळतील. प्रत्येक कुटुंबाला एकच रोप मिळेल. कोणत्याप्रकारचे झाडे हवी आहेत. याची आगाऊ मागणी ड्रोंगोकडे नोंदवावी. या रोपांचे वाटप जागतिक पर्यावरणदिनी, म्हणजे ता. 5 जून रोजी होईल. इच्छूक नागरिकांनी अधिक माहितीसाठी ड्रोंगोचे अध्यक्ष सुधीर सुकाळे यांच्याशी संपर्क साधावा. रोपनोंदणीसाठी 9822014939/9421997301/9881133085 या भ्रमणध्वनी नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सातारकरांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम, ड्रोंगोकडे नावनोंदणीसाठी आवाहन
RELATED ARTICLES

