साताराः अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम जगभर पोहचवणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंनिस व विवेक वाहिनी,विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने खुनाचा मुख्य सूत्रधार मिळालाच पाहिजे, हम सब दाभोलकर, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंनिस ने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन केले.
सातारा जिल्ह्यातील प्रामाणिक पुरोगामी कार्यकर्ते व विदयार्थ्यांनी या मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या कार्यकर्त्यांची हत्या होत आहे. सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीच्या साधकांचा या खुनात सहभाग असल्याचे आरोप पत्रात नमूद केले आहे, पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावामुळे फरारी गुन्हेगारास अटक करण्यास तपासी यंत्रणेला अपयश येत आहे. तपासी यंत्रणेकडून आंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस आणि बक्षीस जाहीर करून उपयोग झालेला नाही. संविधान, अल्पवयीन मुली, मागासवर्गीय ,अल्प संखांक,भटके विमुक्त जाती यांच्या विरोधात वातावरण तयार केले जात आहे. संविधानाला धक्का पोचवून संविधानिक संस्था मेडीकल आणण्याचा डाव भाजप सरकार कडून होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून अंनिस, विवेक वाहिनी,समविचारी पक्ष संघटना, संस्थेचे प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी आज सकाळी डॉ दाभोळकर यांची प्रतिमा घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
या वेळी प्रशांत पोतदार, वंदना माने, विजय मांडके, भगवान रणदिवे, वसंत नलावडे, सुप्रिया गोताड, प्रियांका निकम, अजय ढाणें कोमल घाडगे, अश्विनी जाधव, विवेक वाहिनीचे आनंद सणस व विदयार्थ्यांनी यांनी डॉ दाभोळकर यांच्या चळवळी बद्दल आठवणी ताज्या केल्या.सातारा नगर परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते यांना दरवर्षी पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, पण, हिंदुत्वादी संघटनेच्या दबावामुळे यंदा पुरस्कार जाहीर केला नाही, याबाबत साताराचे खासदार व आमदार आणि नगर परिषद प्रशासन विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जवाब दो आंदोलन… महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोळकर व डॉ. गोविंद पानसरे यांचे खुनातील दिरंगाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले..