सातारा :-.येथील श्यामसुंदरी रिलीजियस अँड चॅरिटेबल सोसायटीच्या के .एस. डी. शानभाग विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा इयत्ता दहावीत शिकणारा श्लोक विक्रम घोरपडे या खेळाडूने नुकतीच संपन्न झालेल्या कोईमतुर तामिळनाडू येथील एम. आर. एफ. मोग्रीप सुपर क्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप 2023 मोटो क्रॉस स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. या संपन्न झालेल्या स्पर्धेत श्लोक घोरपडे याने विविध तीन प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला सोळा वर्षाखालील गटात तसेच एस एक्स 2 आणि एस एक्स1 या गटांमध्ये त्यांनी आपली कामगिरी दाखवली. श्लोकने सोळा वर्षाखालील गटामध्ये विजय संपादन केला, तसेच एस एक्स 2 गटातही विजय खेचून आणला .मात्र केवळ एका गुणाच्या फरकाने एस एक्स 1 या गटातील स्पर्धेत त्याला हार मानवी लागली .
साताऱ्यातील श्लोक ने अतिशय अल्पवयात उत्कृष्ट रेसिंग स्पर्धेत कामगिरी करत आत्तापर्यंत झालेल्या विविध देश स्तरावरील स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची चुणूक आणि कसब दाखवली आहे. तो नुकताच इयत्ता दहावीची माध्यमिक शाळांत परीक्षा देऊन या स्पर्धेसाठी सहभागी झाला होता .त्याच्या या यशाबद्दल के. एस. डी. शानभाग विद्यालय चे संस्थापक रमेश शानभाग, संचालिका आँचल घोरपडे, प्राचार्या सौ.रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यानी अभिनदंन करुन पुढिल् स्पर्धेसाठी शुभेछा दिल्या.