मेढा / प्रतिनिधी :- कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय पुणे यांचा “यशस्वी उद्योजक ” सन्मान पुरस्कार सौ . मनिषा नितीन साळुंखे यांना जाहिर झाला असून त्याचे वितरण ३ जानेवारी सावित्रीबाई फुले .जयंतीदिनी एका खास कार्यक्रमात मान्यवरांचे उपस्थीतीत त्याचे वितरण करण्यात आले .
कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय पुणे , या विभागातंर्गत व्यवसाय कौशल्य शिक्षण आत्मसात करून स्वकर्तृत्वाने एक यशस्वी उद्योजक होवून राष्ट्राच्या विकासामध्ये आपण हातभार लावत आहात . त्यामुळे सौ . मनिषा साळुंखे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ” व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे चे सहसंचालक चंद्रकांत निनाळे , उपसंचालक – यतिन पारगांवकर ,, डॉ. स्वाती मुजुमदार , स्मिता घैसास, आय. टी. आय. पुणे चे उपसंचालक _ रमाकांत भावसार, इत्यादी मान्यवरांचे उपस्थीती मध्ये महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांच्या हस्ते सौ. मनिषा साळुंखे यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. सदरचा कार्यक्रम भीमसेन जोशी सभागृह , पुणे येथे संपन्न झाला.
सौ. मनिषा साळुंखे ह्या सौ. सुशिलादेवी साळुंखे ज्युनिअर कॉलेजच्या एम् .एल. टी. च्या विद्यार्थीनी ,दिशा लॅब व श्री. स्वामी समर्थ पॅथॉलजीच्या सव्हेंसर्वा असून अंजुम मुल्ला , दिशा डायग्नॉस्टीक सेंटरचे डॉ. कैलास खडतरे यांचे त्यांना विशेष सहकार्य , व मार्गदर्शन लाभले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबध्दल सौ. सुशिलादेवी साळूंखे ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या – सी. ए. कदम, लॅब टेक्नीशिएशन असोशिएशन सातारा व जावली तालुका यांनी व समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मला हा मिळालेला पुरस्कार , माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल . जीवन शिक्षण दिलेल्या माझ्या कॉलेजचा मला सार्थ अभियान आहे . सातारमधील वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर्स ,व मान्यवर यांनी देखील मला मौलिक साथ दिली आहे असून
आई, वडील आणि सहा बहिणी असे आमचे कुटुंब असूनही आई वडिलांनी कधीही मुलगा, मुलगी हा भेदभाव न मानता आम्हा बहिणींना शिकवले. माझ्या समोर देखील अनेक अडचणी असताना देखील आई , वडील, पती, सासु, सासरे, मुलगा यांच्या सहकार्यातुन मी प्रत्येक अडचणीवर मात करत आज इथपर्यंत पोहोचले आहे .
सौ . मनिषा साळुंखे