Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीशिक्षणाच्या मुलभूत गरजांपासून कोणीही वंचित राहू नये : किशोर बर्गे

शिक्षणाच्या मुलभूत गरजांपासून कोणीही वंचित राहू नये : किशोर बर्गे

कोरेगावः कोरेगांव शहर विकास मंचचे वतीने कोरेगांव जि. प. प्राथमिक शाळा नं. 2 मधील विद्यार्थ्यांना मंचचे अध्यक्ष व कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे विध्यमान संचालक श्री. किशोर बर्गे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणेत आले. जावेद बागवान यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून मुख्याध्यापक दत्तात्रय भांगे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी श्री. किशोर बर्गे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आमचा कोरेगांव शहर विकास मंच दरवर्षी प्राथमिक शिक्षणाच्या मुलभूत गरजांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी कार्यरत असतो. व मंचचे वतीने गरजुंना शैक्षणिक साहित्य देवून आम्ही शाळेत मुलांचा नवीन वर्षाचा प्रवेशोत्सव साजरा करीत असतो. आमचा कोरेगांव शहर विकास मंच आपली सामाजीक बांधीलकीची जबाबदारी पार पाडीत आहेच परंतु यासोबतच त्यांना शासनाकडूनही शैक्षणिक साहित्य मिळणे गरजेचे आहे. शिक्षणाची पायाभरणी प्राथमिक शाळेतच होत असते त्यासाठी शाळेचा शिक्षक वर्ग मनापासून लक्ष घालतात ही मोठी कौतुकाची बाब आहे.
या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास जि. प. प्राथमिक शाळा नं. 2 चा शिक्षक वर्ग, कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे,राजु बागवान,व इतर मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular