Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात कोडोली येथील हॉटेल व्यवसायिक युवकाचा निघृण खून

सातार्‍यात कोडोली येथील हॉटेल व्यवसायिक युवकाचा निघृण खून

शासकीय रुग्णालयात तणावचे वातावरण
सातारा : सातारा कोडोली येथील सम्राट हॉटेल व्यवसायीक सम्राट विजय निकम (वय 25) याच्यावर अज्ञातानी धारदार कोयत्याने वार व आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने गंभीरपणे मारहाण करून निघृण खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी पावणेचार वाजता दत्तनगर येथील कॅनॉल परिसरात घडल्याचे वृत्त आहे.
हा प्राणघातक हल्ला जुन्या भांडणाच्या कारणातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मृतदेह शवविच्छेदनात जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असता मृताच्या नातेवाईकांसह सम्राट याच्या मित्रपरिवाराने मोठ्या जमावाने ठिय्या दिल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांच्या भावनां तीव्र बनल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवताना सातारा शहर पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सम्राट विजय निकम हा सायंकाळी पावणेचार वाजता दुचाकीत महामार्गावर पेट्रोल भरून पुन्हा कोडोलीच्या दिशेने जात होता. यावेळी पाठीमागून त्याचा पाठलागं करत आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्या डोळ्यात हॉकीच्या स्टीकचा जोरदार फटका दिला त्यानंतर धारदार शस्त्राने डोक्यात वार केला. या प्राणघातक हल्ल्यात सम्राट गाडीवरून जागीच रस्त्यावर कोसळला. या हल्ल्याचे वृत्त कोडोलीत पसरताच एकच खळबळ उडाली. सम्राट ला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र मार वर्मी बसल्याने रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. साडेचार वाजेपर्यंत निकम च्या नातेवाईकांची गर्दी जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सातार्‍याचे उपअधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली. सम्राटच्या मृत्यूचे वृत्त जाहीर होताच निकम कुटुंबियांचे आप्तेष्ट यांना शोक अनावर झाला. मित्रमंडळी व जवळच्या नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालय आयसीयू व तत्काळ सेवा कक्षाच्या दर्शनी भागात एकच गोंधळ सुरू झाला. रूग्णालय व्यवस्थापन व नातेवाईक यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्हा रुग्णालय व सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तळ दिला. सम्राटच्या नातेवाईकांकडून रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. प्राथमिक माहितीत जुन्या भांडणाच्या कारणातून सम्राट याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सातार्‍यातील एका स्थानिक गुंडाचा सहभाग असल्याची माहिती समोर येत असून तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या ला दुजोरा दिला नाही. पोलिसांनी गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पथके तातडीने रवाना केली असून कोडोलीत सध्या तर तणावपूर्ण शांतता आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular