म्हसवड : वयाची पंचाहत्तरी पार करुनही तरुणांना लाजवेल अशी ठणठणीत प्रकृती ठेवुन जागतीक दर्जाचा धावपटु ठरलेल्या हुसेन बोल्ट पेक्षाही अधिक गतीने धावत असलेल्या माणदेशी बोल्ट म्हणुन ओळखल्या जात असलेल्या म्हसवड येथील मुसाभाई मुल्ला यांना त्यांच्या या धावण्याचा स्टँमीना बद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान देण्यात आले असुन नुकतेच त्यांना इंडिया बुक च्या वतीने प्रशस्तीपत्र, मेडल, पेन, रेकॉर्ड होल्डरचा स्टिकर व बँच देवुन सम्मानित करण्यात आले आहे.
खरेतर आजच्या धकाधकीच्या जिवनात माणसाचे आयुष्य हे खुप छोटे झाले आहे, त्यामुळे दैनंदिन कामात तो इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच नाही त्याचाच परिणाम त्याच्या प्रकृतीवर होत असल्याने अकाली वयातच त्याला वार्धक्य आल्याचे दिसुन येते असे चित्र जवळपास सर्वच लोकांमध्ये दिसुन येते. मात्र याला अपवाद ठरलेत ते म्हसवड चे मुसाभाई मुल्ला. आज मुसाभाईंचे वय 76 हुन अधिक आहे तरीही त्यांचा या वयातील धावण्याचा सराव पाहुन कोणालाही त्यांचे कौतुक वाटेल असा आहे. आजकाल 76 वयापर्यंत फार कोणी जगत ही नाही मात्र या वयात मुसाभाईंचा चपळपणा तरुणांनाही लाजवेल असाच आहे. या वयातही ते रोज 2 तास नियमित व्यायाम तर करतातच याशिवाय धावण्याचाही मोठा सराव ते नेहमी करताना दिसतात. या वयात त्यांना धावताना पाहिल्यास त्यांच्या अंगात यंत्र बसवले आहे की काय अशी शंका कोणालाही आल्याशिवाय रहात नाही. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या व्यक्तीला साधे निकट उठता येत नाही त्याला प्रत्येकवेळी कोणाच्या तरी आधाराची गरज भासते काहींना तर अंथरुणालाच खिळुन रहावे लागते पण मुसाभाई मात्र या वयातही सर्वांसाठी आदर्श व्यक्तीमत्व ठरले आहेत. जागतीक दर्जाचा धावपटु ठरलेल्या हुसेन बोल्ट चा रेकॉर्ड हा 10 सेंकदाला 100 मिटर असा आहे, तर मुसाभाई हे या वयातही 9 सेंकदात 50 मिटर त्याच्याप्रमाणेच गतीने धावत आहेत. वयाची पंचाहत्तरी पार करुनही वार्याच्या गतीने ताशी 90 च्या स्पिडने धावणार्या मुसाभाईला अवलीयाच म्हटले पाहिजे. त्यांना अशाप्रकारे धावताना पाहुन अनेकांनी त्यांना आपल्या मोबाईलमध्ये कँमेराब्द्ध केले आहे त्यामुळे सोशल मिडीयावर त्यांना अनेक तरुणांनी पसंती दिली आहे, याची गंभीर दखल घेत सर्व न्यूज चँनेलनेही त्यांना प्रसिध्दी दिली याची दखल घेवुन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( फरिदाबाद, हरियाणा ) मध्ये त्यांची नोंद घेण्यात आली असुन नुकतेच त्यांना इंडिया बुक च्या प्रतिनिधींनी घरी येवुन त्यांना वरील प्रशस्तीपत्र व साहित्य देवुन गौरवले.
मुसाभाई यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याने म्हसवड मध्ये सध्या त्यांचाच बोलबाला सुरु आहे तर युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ते आजही उत्सुक असल्याचे मुसाभाई सांगतात. त्यांच्या या गौरवाबद्दल विविध क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये म्हसवडच्या मुसाभाई मुल्ला यांची नोंद
RELATED ARTICLES