Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीनरेंद्र पाटील यांचे युतीचे मेळावे सुरू, निकालाची प्रतीक्षा न करता आभार दौरा...

नरेंद्र पाटील यांचे युतीचे मेळावे सुरू, निकालाची प्रतीक्षा न करता आभार दौरा सुरू

कराड: लोकसभेसाठी मतदान झाल्या नंतर, अवघ्या दोन दिवसांत आपल्या मतोश्रींच्या दुःखद निधनास सामोरे गेलेल्या सातारा लोकसभा युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मातोश्रींच्या उत्तर विधी समाप्तीनंतर संपूर्ण सातारा जिल्हा पुन्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सातारा-कराड येथे अनुक्रमे शिवसेना आणि भाजप यांच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. सातारा येथे शिवसेना संपर्क प्रमुख ना.नितीन बानूगडे पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाटगे, जयवंत शेलार आणि सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेना मेळावा पार पडला. नरेंद्र पाटील यांनी मतदारसंघात झालेलं मतदान याचा आढावा घेतला, सर्व कार्यकर्ते पदाधिकरी यांचे आभार मानून अत्यंत कमी काळात चांगल्या पध्दतीने केलेल्या प्रचार कार्याचे कवतुक करून सर्वांचे आभार मानले.
कराड येथे भाजपचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनुप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी आपल्या उमेदवारीचा थोडक्यात इतिहास मांडून सर्वांनी प्रचार कार्यात दिलेल्या योगदान चे चीज माझ्या विजयाने निश्चितच होईल असा विश्वास व्यक्त केला.
मतदारसंघात तालुक्यातील प्रमुख गावात जाऊन प्रमुख नेत्यांच्या बरोबरीने, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देण्याचा कार्यक्रम पुढील आठवडाभर करणार असल्याचे, नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. आभार दौर्‍यात आत्ता पर्यंत वाई-सातारा-खंडाळा-पाचगणी-महाबळेश्वर-जावळी या भागातील प्रमुख गावांना भेटी देण्याचे आणि मतदारसंघात काम केलेल्या प्रमुखांचे कार्यकर्त्यांचे भेटीगाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कोरेगाव-कराड उत्तर आणि खटाव भागातील दुष्काळी गावांना भेटी देण्याचा कार्यक्रम याच आठवड्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, माझ्या प्रचारात, भाजप शिवसेना आणि सर्व सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले. माझ्या प्रचारासाठी मतदारसंघात दोन वेळा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या, त्याच बरोबर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली, तर प्रचार सांगतेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः सभा घेतल्याने प्रचाराचा सर्वोच्च क्षण मी अनुभवला. ना.चंद्रकांतदादा पाटील, ना.दिवाकर रावते या प्रमुख मंत्र्यांनी लोकसभा मतदारसंघात घेतलेल्या सभा या मुळे प्रचाराला बळ मिळाले. अत्यंत कमी वेळात, माझ्या माथाडीच्या सहकार्‍यांनी गावोगावी प्रचारात वेळ दिला, भाजपचे ना.शेखर चरेगावकर, ना.अतुल भोसले, महेश शिंदे,मनोज घोरपडे,दिपक पवार,मदनदादा भोसले यांनी प्रचार कार्यात महत्वपूर्ण भूमिका घेतली, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचाराचे शिवधनुष्य लिलया पेलले.
या पुढील काळात जास्तीतजास्त भेटी घेऊन सर्वांचे व्यक्तिगत आभार प्रदर्शन करण्याचा मानस असल्याचे यावेळीं नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular