Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीनटराज मंदिराच्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवाला आरंभ ; समर्चनाच्या कलाकारांनी केलेल्या...

नटराज मंदिराच्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवाला आरंभ ; समर्चनाच्या कलाकारांनी केलेल्या नृत्याने प्रेक्षकमंत्रमुग्ध ; एकाचवेळी नृत्य आणि चित्रकलेच्या अविष्काराचे सादरीकरण

साताराः पुणे येथील समर्चना नृत्य संस्थेच्या गुरु श्रीमीत गिरीजा यांच्या मार्गंदर्शनाखाली  5 कलाकार शिष्यांचा बहारदार भरतनाट्यम नृत्यांचा अविष्कार सादर होत नटराज संगीत-नृत्य महोत्सवास  सुरुवात  झाली.याचवेळी श्‍लोक घघेरपडे याने निसर्ग चित्र फलकावर काढत एक अनोखा अविष्कार साकारला.
पुणे येथील या कलाकारांनी  नटराज मंदिरातील परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी कला मंदंीराच्या भव्य स्टेजवर आपल्या निपुण पदलालीत्य आणी भावमुद्रांचा सुरेख नजारा दाखवत महोत्सवातील पहिल्या भरतनाट्यम नृत्यांचा अविष्कार सादर केला.
सालाबाद प्रमाणे श्री नटराज मंदीराच्या महारुद्र,महाशिवरात्री संगीत व नृत्यमहोत्सवाचे प्रथम पुष्प सादर करताना कलाकारांनी आपल्या नृत्यातून उपस्थितांना अनोखा आनंद दिला.
या महोत्सवाचे उद्घाटन सातारा येथील उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,मंदीराचे  व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग,नटराज कला शाळेच्या गुरु सौ.ऑचल घोरपडे,विश्‍वस्त मुकूंद मोघे व संयोजिका सौ.उषा शानभाग,रणजीत सावंत,सौ.राजवी हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पुजन आणी दिप प्रज्वलनाने झाले.
 यावेळी मंदीराचे विश्‍वस्त के.नारायण राव,वासुदेवन नायर,रमेश हलगेकर, राहूल घायताडे यांची उपस्थिती होती.नटराज मंदिरातील वेदमूर्ती अजय जोशींंनी वेदमंत्राचा उच्चार केला.पत्रकार अतुल देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सुहास राजे शिर्के की,नटराज मंदीराने हे कलादालन युवा पिढीतील नृत्य,संगीत क्षेत्रात शिक्षण घेत चमकणार्‍या कलाकारांसाठी उपलब्ध केले आहे. नटराजाचे आशीर्वाद आपणा सवार्र्ना मिळून  या महोत्सवाची  किर्र्ती अशीच वाढत राहू  देत. सातारा शहराच्या सांस्कृतिक उपक्रमात मंदिराचे विश्‍वस्त या महोत्सवाने अधिक भर घालत आहेत. ही मोठी कौतुकाची बाब आहे. पालीकेच्या माध्यमातून मंदिराच्या नव्या उपक्रमांना पाहीजे तेे सहकायर्ं आम्ही करत राहू.
 यावेळी सुहास राजे शिर्के यांचा शाल,श्रीफळ व प्रसाद देउन मंदिराचे वतीने सत्कार करण्यात आला.
या नृत्य कार्यक्रमाची सुरुवात सौंदर्य लहरीतील शिवशक्ती श्‍लोकाने करत कलाकारांनी मार्गम या शुध्द भरतनाट्यम नृत्य प्रकारातील अलारिपूने करत पंचजातीमध्ये या नृत्याची पेशकश श्रध्दा प्रसाद यांनी साकारली. त्यानंतर 2 लयीत दरु वर्णम हा वर्णम चा प्रकार सादर करताना स्वर, बोल, लय, हे चित्तारुप वर्णम खमाज रागात आदीतालात सादर झाले. यात राजराजेश्‍वरी देवीची स्तुती असणारे राजा मलयध्वज च्या पुत्र कामेष्ठी यज्ञात देवीने प्रकट केलले रुप व त्याचे दर्शन नृत्यातून अमृता,रेवती श्रध्दा व अंजली राजू यांनी घडवले.
 त्यानंतर संकीर्तन हा आगळा वेगळा प्रकार ज्यात महाराष्ट्रातील विविध संतांच्या मनमोहक रचनांवर आधारीत टाळा वाजवत पायाने नृत्याची निपूणता दाखवत कथा साकारली. यात संवाद,किर्तन,पारंपारिक दिंडी,भजन याचा समावेश होता. हे संकिर्तन सादर करताना शरीराच्या केेल्या लयबद्ध हालचाली व शरीराची कमनीयतेचे सुरेख दर्शन घडवत नृत्य साधनेने शरीर किती लवचीक होउ शकते याचे प्रत्यंतर देताना उपस्थित प्रेक्षकांना अचंबीत केले.
तिल्लाना सादर होत या नृत्याविष्काराची सांगता झाली.
 नृत्यामध्ये सहभागी झालेल्या नमिता मुजुमदार,अंजली राजू,श्रध्दा प्रसाद,अमृता नेवगी,संजना करकरे या सर्व कलाकारांचा सत्कार सौ.उषा शानभाग यांचे हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देवुन करण्यात आला.यावेळी नटराज मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 उद्या दि. 6 रोजी सायंकाळी 6.30  वाजता अहमद नगर येथील अंजली नृत्यालयाच्या सौ.अंजली डावरे  आणी सहकलाकारांचा भरतनाट्यमचा कार्यक्रम सादर होणार आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular